Arvind Kejriwal: सुटका केल्यास काम करु शकत नाही... सुप्रीम कोर्टाचे अरविंद केजरीवाल यांच्याबाबत महत्वाचे विधान

Arvind Kejriwal News: सुप्रीम कोर्टाने आजच्या सुनावणीत अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावरुन सर्वात महत्वाचे विधान केले. जामिनावर सुटल्यानंतर तुम्ही ऑफिशियल कामं करू शकत नाहीत, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.
High Court On Arvind Kejriwal
High Court On Arvind KejriwalSaam Digital

दिल्ली,|ता. ७ मे २०२४

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर सुप्रीम कोर्टात सध्या सुनावणी सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने आजच्या सुनावणीत अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावरुन सर्वात महत्वाचे विधान केले. जामिनावर सुटल्यानंतर तुम्ही ऑफिशियल कामं करू शकत नाहीत, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामिन अर्जावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडत आहे. आज न्यायालयाने संपूर्ण सुनावणी ऐकून घेतल्यानंतर निकाल राखून ठेवला असून दुपारी याबाबत निर्णय देण्याची शक्यता आहे. तत्पुर्वी न्यायालयाने केजरीवाल यांची सुटका अन् मुख्यमंत्रीपदाच्या कामकाजाबाबत महत्वाचे विधान केले.

"केजरीवाल हे लोकांनी निवडून दिलेले मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे निवडणुका लक्षात घेता जामिनाचा विचार करत आहोत. निवडणुका नसत्या तर जामिनावरील निकाल राखून ठेवला असता. मात्र आम्ही हे स्पष्ट करतो की जर आम्ही तुम्हाला सोडले तर तुम्ही अधिकृत कर्तव्ये पार पाडू नयेत अशी आमची इच्छा आहे," असे सर्वात मोठे विधान न्यायालयाने यावेळी केले.

High Court On Arvind Kejriwal
Arvind Kejriwal News: १०० चे १००० कोटी कसे झाले? अरविंद केजरीवाल यांच्या कारवाईवरुन सुप्रीम कोर्टाचा ईडीला सवाल; सुनावणीत काय घडलं?

त्याचबरोबर आजच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने ईडीलाही परखड सवाल केले. हा १०० कोटींचा घोटाळा आहे तर ११०० कोटी कसे जप्त करण्यात आले. दोन वर्षात आकडा कसा वाढला? असा प्रश्न न्यायमुर्तींनी केला. तसेच कोणत्याही यंत्रणेने दोन वर्ष तपास ताटकळत ठेऊ नये, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

High Court On Arvind Kejriwal
Kolhapur Constituency : 'लोकांमध्ये मिसळणे आमच्यासाठी नवीन नाही', मतदानाचा हक्क बजावल्यानंतर शाहू महाराज छत्रपतींच्या नातीने स्पष्टच सांगितलं, Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com