Who is Atishi : पहिल्या टर्ममध्येच आमदार, पुन्हा मंत्री आता थेट मुख्यमंत्री; कोण आहेत आतिशी?

Who is Atishi Delhi New CM : 'आप'च्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत आतिशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यामुळे आतिशी या लवकरच दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे.
Who is Atishi Delhi New CM
Who is Atishi Delhi New CMSaam TV
Published On

कथित अबकारी धोरण घोटाळा प्रकरणात नाव आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयामुळे दिल्लीच्या राजकारणात मोठा भूकंप आला. केजरीवाल यांच्यानंतर दिल्लीचा कारोभार नेमकं कोण सांभाळणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून होतं. अखेर 'आप'च्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत आतिशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यामुळे आतिशी या लवकरच दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे.

Who is Atishi Delhi New CM
Delhi Breaking News : मोठी बातमी! दिल्लीचा नवा मुख्यमंत्री ठरला, विधिमंडळ पक्षनेतेपदी 'या' नावावर शिक्कामोर्तब

आज मंगळवारी सकाळी ११ वाजचा अरविंद केजरीवाल यांच्या सिव्हिल लाईन्स या निवास्थानी आपच्या नेत्यांची महत्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत आतिशी यांच्या नावासोबतच मुख्यमंत्रीपदासाठी कैलाश गेहलोत, गोपाल राय आणि सौरभ भारद्वाज यांच्या नावांचीही चर्चा करण्यात आली. मात्र, शेवटच्या क्षणी आतिशी यांच्या नावावरच शिक्कामोर्तब करण्यात आले.

कोण आहेत आतिशी?

आतिशी या अरविंद केजरीवाल यांच्या सरकारमधील मंत्रिमंडळातील सर्वात हेवीवेट मंत्री आहेत. सध्या त्यांच्याकडे मंत्रिमंडळातील अनेक खाती आहेत. केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याची घोषणा केल्यानंतर सर्वात आधी आतिशी यांचे नाव समोर आले होते. आतिशी या पंजाबी राजपूत कुटुंबातील असून त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे.

2020 मध्ये आतिशी पहिल्यांदा आमदार

2020 च्या विधानसभा निवडणुकीत आतिशी पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2023 मध्ये त्यांना पहिल्यांदा केजरीवाल सरकारमध्ये मंत्रि‍पदाचा मान मिळाला. आता अवघ्या एका वर्षानंतर 2024 मध्ये आतिशी या दिल्लीच्या मुख्यमंत्री होणार आहेत. यापूर्वी, आतिशी यांनी 2019 मध्ये पूर्व लोकसभेच्या जागेवरून निवडणूक लढवली होती. यामध्ये त्यांचा पराभव झाला होता.

आतिशी केजरीवाल यांच्या जवळच्या सहकारी

आतिशी या केजरीवाल यांच्या अत्यंत जवळच्या सहकारी आणि विश्वासू नेत्या मानल्या जातात. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या काळापासून त्या आम आदमी पार्टीत सक्रिय आहेत. सध्या त्यांच्याकडे बहुतांश मंत्रालयांची जबाबदारी आहे. अरविंद केजरीवाल तुरुंगात गेल्यापासून त्या पक्षापासून ते सरकारपर्यंतच्या मुद्द्यांवर पुढाकार घेताना दिसून येत आहेत.

आतिशी यांचे वडील प्राध्यापक आहेत

आतिशी यांचा जन्म 8 जून 1981 रोजी दिल्लीत झाला. त्यांचे वडील नामविजय सिंह हे दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक आहेत. आतिशी यांनी त्यांचे शालेय शिक्षण स्प्रिंगडेल स्कूल, नवी दिल्ली येथून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी सेंट स्टीफन कॉलेजमध्ये इतिहासाचा अभ्यास केला आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून चेव्हनिंग स्कॉलरशिपवर पदव्युत्तर पदवी मिळवली.

आतिशी दिल्लीच्या तिसऱ्या मुख्यमंत्री

काही वर्षांनंतरच आतिशी यांनी शैक्षणिक संशोधनात रोड्स स्कॉलर म्हणून ऑक्सफर्डमधून दुसरी पदव्युत्तर पदवी मिळवली. यादरम्यान त्यांनी मध्य प्रदेशातील एका छोट्या गावात ७ वर्षे घालवली, जिथे आतिशी यांनी सेंद्रिय शेती आणि प्रगतीशील शिक्षण प्रणालींमध्ये आपला हातभार लावला. यासोबतच अनेक संस्थांसोबत काम केले. आता त्या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

Who is Atishi Delhi New CM
Delhi Politics : अरविंद केजरीवाल आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार, दिल्लीचे नवे सीएम कोण होणार? 'ही' नावे चर्चेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com