Liquor Scam Case: दिल्ली न्यायालयाचा 'आप'ला धक्का; संजय सिंह यांचा जामीन अर्ज फेटाळला

Sanjay Singh News : दारू घोटाळ्यात तुरुंगात असलेले आपचे खासदार संजय सिंह यांना मोठा धक्का बसलाय. शुक्रवारी दिल्ली न्यायालयाने आप खासदाराचा जामीन अर्ज फेटाळलाय. ईडीने संजय सिंह यांनी दिल्ली दारू धोरण घोटाळ्याप्रकरणी ४ ऑक्टोबर रोजी अटक केली होती.
Sanjay Singh
Sanjay Singh Saam Tv
Published On

Sanjay Singh Bail Application:

दारू घोटाळ्यात तुरुंगात असलेले आपचे खासदार संजय सिंह यांना मोठा धक्का बसलाय. शुक्रवारी दिल्ली न्यायालयाने आप खासदाराचा जामीन अर्ज फेटाळलाय. मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने जामीन अर्ज फेटाळलाय. दरम्यान ईडीने दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी ४ ऑक्टोबर रोजी संजय सिंह यांना अटक केली होती. (Latest News)

दारू घोटाळ्यात तुरुंगात असलेले आप खासदार संजय सिंह यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने जामीन अर्ज फेटाळलाय. न्यायालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणात सिंह यांना जामीन देण्यास नकार दिलाय. दरम्यान याआधीच्या गुरुवारी न्यायालयाने या प्रकरणाच्या कामकाजाला स्थगिती देत जामीन याचिकेवर २२ डिसेंबर रोजी घेतली जाणार असल्याचं म्हटलं होतं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आरोपीतून सरकारी साक्षीदार बनलेले दिनेश अरोरा आणि आप खासदाराला लाच देण्याबाबत इतर साक्षीदारांच्या जबाबात विरोधाभास असल्याचं संजय सिंह यांनी आपल्या युक्तीवादात सांगितलं. ईडीने आप खासदार संजय सिंह यांच्या जामीन अर्जाचा विरोध केला. सध्या या दारू घोटाळ्याचा तपास केला जात आहे.

आरोपीतून सरकारी साक्षीदार बनलेले दिनेश अरोरा आणि आप खासदाराला लाच देण्याबाबत इतर साक्षीदारांच्या जबाबात विरोधाभास असल्याचं संजय सिंह यांनी आपल्या युक्तीवादात सांगितलं. ईडीने आप खासदार संजय सिंह यांच्या जामीन अर्जाचा विरोध केला. सध्या या दारू घोटाळ्याचा तपास केला जात आहे. जर जामीन दिला गेला तर तपासात व्यत्यय येईल. पुराव्याची छेडछाड केली जाऊ शकते.

साक्षीदारांवर दबाव टाकला जाऊ शकतो. २०१२-२०२२ च्या महसूल शुल्क धोरण तयार करणं आणि ते धोरण लागू करण्यात संजय सिंह यांनी महत्त्वाची भूमिका होती. दारू धोरणाचा थेट फायदा दारू निर्माते, ठो विक्रेती आणि किरकोळ विक्रेत्यांना याचा फायदा झाला होता.

Sanjay Singh
India Alliance News: 'आप पंजाबच्या सर्व 13 लोकसभा जागांवर निवडणूक लढवणार', INDIA आघाडीच्या बैठकीपूर्वी केजरीवालांचे मोठे वक्तव्य

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com