Delhi Election : मुख्यमंत्री आतिशींना अटक होऊ शकते, निवडणुकीच्या तोंडावर अरविंद केजरीवालांचा खळबळजनक दावा

Arvind Kejriwal claim : दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरच माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दावा करून खळबळ उडवून दिली आहे. आतिशी यांना अटक होऊ शकते, असं ते म्हणाले.
Arvind Kejriwal and CM Atishi
Arvind Kejriwal and CM Atishisaam tv
Published On

दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना अटक होऊ शकते, असा खळबळजनक दावा आम आदमी पक्षाचे (AAP) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर केजरीवालांनी केलेल्या या दाव्यानं दिल्लीचं राजकारण ढवळून निघण्याची चिन्हे आहेत.

अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी मुख्यमंत्री आतिशी, मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांच्यासमवेत एक पत्रकार परिषद घेतली. माझ्यावर पुन्हा छापे पडू शकतात. परिवहन विभागातील एका प्रकरणात असं केलं जाऊ शकतं, अशी शंकाही केजरीवाल यांनी व्यक्त केली.

मला सूत्रांकडून अशी माहिती मिळाली आहे, असं स्पष्ट करतानाच, तीन-चार दिवसांपूर्वीच आम्हाला सूत्रांकडून कळले की ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या लोकांची बैठक झाली आहे. कोणत्याही खोट्या गुन्ह्यांत आतिशी यांना अटक करा, असे आदेश त्या बैठकीत वरिष्ठ पातळीवरून मिळाले आहेत, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. मी खूप जबाबदारीने हे आरोप करत आहे. कोणत्याही खोट्या केसमध्ये आतिशी यांना अटक करा असे या तिन्ही एजन्सींना सांगण्यात आलं आहे, असंही ते म्हणाले.

धाडी टाकणार, केजरीवालांचा दावा

निवडणूक तयारीत बाधा आणण्यासाठीच माझ्यासह मनीष सिसोदिया, संजय सिंह, आतिशी, सौरभ भारद्वाज यांच्यावर धाडी टाकल्या जातील. ट्रान्सपोर्ट विभागात खोटी केस तयार केली जात आहे असं सूत्रांकडून कळलंय, असा दावाही केजरीवाल यांनी केला आहे.

महिलांसाठीची मोफत प्रवास योजना यांना बंद करायची आहे. ट्रान्सपोर्ट विभागात खोटी केस तयार केली जात आहे. पण मला विश्वास आहे की लोक या घाणेरड्या कारस्थानांना प्रत्युत्तर देतील. देशातील जनतेला अशा प्रकारचं राजकारण अजिबात आवडत नाही, असंही केजरीवाल म्हणाले.

न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे- आतिशी

ट्रान्सपोर्ट विभागातील एका बनावट प्रकरणाच्या माध्यमातून दिल्लीत महिलांना मिळणारी मोफत प्रवास योजना बंद करण्यासाठी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी आम्हाला खात्रीशीर माहिती मिळाली आहे. मी नेहमीच प्रामाणिकपणे काम केलंय आणि यापुढेही करेन, असं आतिशी म्हणाल्या.

Arvind Kejriwal and CM Atishi
Maharashtra Politics: आधी CM फडणवीसांना भेटले, आता दिल्लीला जाणार, भुजबळांची नाराजी दूर होणार की मोठा निर्णय घेणार?

माझा देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. ज्याप्रमाणे वरिष्ठ नेत्यांना खोट्या प्रकरणांत अटक करण्यात आली आण त्यानंतर सगळ्यांना जामीन मिळाला. शेवटी सत्य समोर आलं. माझा संविधान आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही आमच्यावर खोट्या केस करून दिल्लीकरांच्या सुविधा बंद पाडायच्या आहेत. दिल्लीची जनता हे सर्व पाहते आहे, असं सांगत आतिशी यांनी विरोधकांना लक्ष्य केलं.

Arvind Kejriwal and CM Atishi
Delhi Government : लाडकी बहीण योजना बंद, दिल्ली सरकारने थेट जाहिरातच काढली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com