'Delhi Chalo' Protest March: उग्र आंदोलन करणारे शेतकरी आंदोलनात का उडवू लागले पतंग?

'Delhi Chalo' Protest March : शेतकरी आंदोलनाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आलीय. गुरुवारी सायंकाळी ५ वाजता चंदीगडमध्ये शेतकरी आणि सरकार यांच्यात बैठक होणार आहे. दरम्यान आज शंभू सीमेवरील अनेक व्हिडिओमध्ये काही शेतकरी पतंग उडवताना दिसत आहेत.
'Delhi Chalo' Protest March
'Delhi Chalo' Protest MarchSaam Tv
Published On

Farmers Start Flying Kites In Protest :

आंदोलक शेतकरी शंभू बॉर्डरवर ठाण मांडून बसले आहेत. शेतकरी आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून पोलीस आणि शेतकरी आमने-सामने आले. पोलिासांनी तयार केलेल्या अडथळ्यांना दूर करत शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत. पहिल्या दिवशीच आंदोलन उग्र झाले आहे. सरकारच्या विरोधात संताप व्यक्त करणारे शेतकरी आज आकाशात पतंग उडवताना दिसले. आंदोलनाचे वातावरण तापले असताना पतंग का उडवत आहेत, असा प्रश्न पडला असेल. (Latest News)

पतंग का उडवू लागले शेतकरी

संतप्त आंदोलन सुरू केल्यानंतर शेतकरी आज चक्क पंतग उडवताना दिसले. आंदोलन शेतकऱ्यांना पतंग उडवताना पाहून अनेकांना धक्का बसला असेल, परंतु पतंग उडवणं हा त्यांच्या आंदोलनाचाच एक भाग आहे. पंजाब-हरियाणाच्या शंभू सीमेवर जमलेले शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिल्लीत शेतकऱ्यांना प्रवेश करता येऊ नये, यासाठी हरियाणा पोलिसांनी मंगळवारी (13 फेब्रुवारी) शेतकऱ्यांवर अश्रुधुराचे गोळे टाकण्यासाठी ड्रोनचा वापर केला. या ड्रोनचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी पतंग उडवण्याची कल्पना अवलंबली. किमान आधारभूत किंमत (एमएसपी) कायद्याच्या मागणीसाठी पंजाबमधील शेतकऱ्यांनी हे आंदोलन पुकारले आहे. आपली मागणी मान्य करण्यासाठी शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत.

मोर्चे काढणाऱ्या आंदोलकांना पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी हरियाणातील सर्व सीमेवर कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. शंभू सीमेवर जमलेल्या शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी हरियाणा पोलिसांनी त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. "दिल्ली चलो" निषेध मोर्चाचा एक भाग म्हणून, संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या नेतृत्त्वात २०० हून अधिक संघटनांना हजारो शेतकऱ्यांसह शंभू सीमेवरून हरियाणात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत.

'Delhi Chalo' Protest March
Explainer: MSP म्हणजे नक्की काय? शेतकरी का आहेत भूमिकेवर ठाम? कायदा झाला तर फायदा होणार का? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com