Abhijeet Dipke : 'माझ्या अटकेची तयारी सुरू'; मध्यरात्री पत्रकार परिषद घेऊन अभिजीत दिपकेंचा खळबळजनक दावा

CJP Tiranga March at Connaught Place Central Park: दिल्लीतील कनॉट प्लेसच्या सेंट्रल पार्कमध्ये प्रस्तावित तिरंगा मोर्चापूर्वी CJP संस्थापक अभिजित दिपके यांनी मध्यरात्री पत्रकार परिषद घेतली. पोलिसांनी ताब्यात घेतले तरी तिरंगा फडकवण्यासाठी तुरुंगात जाण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले.
Abhijeet Dipke: ...इतकी भीती वाटत असेल तर देश बंद करा, अभिजीत दीपके का संतापले?
Abhijeet Dipke On CJP ProtestSaam Tv
Published On: 

Abhijeet Dipke statement before Tiranga March in Delhi : दिल्लीतल्या कनॉट प्लेस इथल्या सेंट्रल पार्कमध्ये आज CJP कडून तिरंगा मोर्चा काढण्यात येणार आहे. तिरंगा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी मध्यरात्री अचानक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत दिपकेंनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, पोलीस मला ताब्यात घेऊ शकतात. पण जर तिरंगा फडकवल्यामुळे तुरुंगात जावे लागत असेल, तर आम्ही त्यासाठी तयार आहोत. (CJP Tiranga March at Connaught Place Central Park)

दरम्यान नवी दिल्ली नगरपालिकेने दिल्लीतील कनॉट प्लेस इतलं 'सेंट्रल पार्क' सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्याची घोषणा केलीय. प्रशासकीय कारणास्तव आज आणि उद्या सेंट्रल पार्क पूर्णपणे बंद राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे. या कालावधीत सुरक्षा व्यवस्थेच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. याच सेंट्रल पार्कमध्ये आज CJP कडून तिरंगा मोर्चा काढण्यात येणार आहे.

Abhijeet Dipke: ...इतकी भीती वाटत असेल तर देश बंद करा, अभिजीत दीपके का संतापले?
Maharashtra Rain Alert: पुणे, सोलापूरसह १० जिल्ह्यांत तुफान पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून 'यलो अलर्ट' जारी

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी म्हटले आहे की, या महत्त्वाच्या तिरंगा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस त्यांना ताब्यात घेऊ शकतात. जर तिरंगा फडकवण्यासाठी तुरुंगात जाण्याची वेळ आली, तरी आपण त्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सीजीपीच्या दास आणि रांका यांनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, त्या निषेधार्थ तिरंगा मोर्चा काढण्यात येणार आहे. आता सरकारकडून सेंट्रल पार्क दोन दिवसांसाठी बंद केले. त्यामुळे पुन्हा एकदा दिल्लीतील वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Abhijeet Dipke: ...इतकी भीती वाटत असेल तर देश बंद करा, अभिजीत दीपके का संतापले?
SIR वरून वाद सुरू असतानाच आयोगाचा मोठा निर्णय; १७ राज्यांसाठी नवे आदेश

"आम्ही मोदीजींना सांगू इच्छितो की या गोष्टींना आम्ही अजिबात घाबरत नाही," असे म्हणत दिपके यांनी, "जर या देशात तिरंगा फडकवण्यासाठी आम्हाला जेलमध्ये जावे लागले, तरी आम्ही तयार आहोत," असा निर्धार व्यक्त केला आहे. सेंट्रल पार्क बंद करण्यावरून त्यांनी प्रशासनावर टीका केली असून, अशा कारवायांमुळे मागे हटणार नसल्याचे त्यांनी दर्शवले आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com