Delhi Assembly Election 2025 Results : देशाच्या राजधानीत नेमकी कुणाची सत्ता येणार? आप गड राखणार की भाजप विजयाचा गुलाल उधळणार?

Delhi Assembly Election 2025 Results LIVE Updates Vote Counting : दिल्लीतल्या सर्व मतदान केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान पार पडलं. तर, निवडणुकीचे निकाल आज जाहीर होतील.
Delhi assembly election 2025 result live updates
Delhi assembly election 2025 result live updatesSaamTV
Published On

नवी दिल्ली : दिल्लीत विधानसभा मतदारसंघातील ७० जागांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान पार पडलं. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ५८ टक्के मतदान झालं होतं. दिल्लीच्या ७० जागांसाठी एकूण ६९९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

या निवडणुकीचे निकाल आता आज जाहीर होणार आहेत. अखेर देशाच्या राजधानीत नेमकी कुणाची सत्ता येणार? या बहुचर्चित प्रश्नाचं उत्तर काही तासांत मिळणार आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष जिंकला तर या पक्षासाठी दिल्लीच्या निवडणुकीतला हा सलग तिसरा विजय ठरेल. तर भाजप जिंकला तर अनेक वर्षांनी भाजप दिल्लीच्या सत्तेवर विराजमान होईल.

Delhi assembly election 2025 result live updates
Karuna Sharma : 'तोंड उघडलं तर मुंडे भावंडांना राजीनामा द्यावा लागेल' करुणा मुंडेंचा पंकजा-धनंजय मुंडेंना इशारा

दिल्लीतल्या सर्व मतदान केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान पार पडलं. तर, निवडणुकीचे निकाल आज जाहीर होतील. मतदानाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि हरियाणामध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती.

या निवडणुकीत आम आदमी पार्टी (आप), भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळाली. आता निकाल काय लागणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. निवडणुकीत उभे असलेल्या ६९९ उमेदवारांमध्ये महिला उमेदवारांची संख्या ९६ असून आम आदमी पक्षाकडून आतिशी मारलेना या प्रमुख महिला चेहरा आहेत. गेल्यावेळी आतिशी यांनी दिल्लीच्या कालकाजी मतदारसंघातून विजय मिळवला होता.

दरम्यान, या सर्व नाट्यात आज एसीबीचे पथक अरविंद केजरीवाल आणि संजय सिंह यांच्या घरी पोहोचले होते. १५ कोटींच्या ऑफर प्रकरणात पथक घरी पोहोचलं होतं. दिल्लीचे एलजी व्हिके रसकसेना यांनी आज शुक्रवारी अरविंद केजरीवाल यांच्या आरोपांची चौकशी करण्याची शिफारस अँटी करप्शन ब्युरोला केली होती. यानंतर एसीबीचे पथक अरविंद केजरीवाल आणइ संजय सिंह यांच्या घराकडे रवाना झाले.

Delhi assembly election 2025 result live updates
Sudarshan Ghule : संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट; आरोपी घुलेच्या मोबाईलमधील डाटा रिकव्हर, सत्य समोर येणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com