Wrestlers Protest : चुकीचं काम करणाऱ्यांना फाशी द्या, कुस्तीपटूंच्या आंदोलनाला केजरीवालांचा पाठिंबा

चुकीचं काम करणाऱ्यांना फाशी द्या, कुस्तीपटूंच्या आंदोलनाला केजरीवालांचा पाठिंबा
Wrestlers Protest
Wrestlers ProtestSaam TV
Published On: 

Arvind Kejriwal Support Wrestlers Protest : भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरणसिंह यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपांवरून दिल्लीच्या जंतरमंतरवर कुस्तीपटूंनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. दरम्यान, आता आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही शनिवारी दिल्लीच्या जंतरमंतरवर कुस्तीपटूंची भेट घेतली.

केजरीवाल यांनी जंतरमंतर येथे जात कुस्तीपटूंना उघडपणे पाठिंबा दिला. देशाचे नाव लौकिक मिळविणारे पैलवान नाराज असल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर चुकीचे काम करणाऱ्यांना फाशी झालीच पाहिजे, असेही ते म्हणाले. (Latest Marathi News)

Wrestlers Protest
Brij Bhushan Sharan Singh: ब्रिजभूषण शरणसिंह यांना अटक होण्याची शक्यता, महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरण

केजरीवाल म्हणाले की, ''कुस्तीपटूंना एफआयआरसाठी सर्वोच्च न्यायालयात जावे लागले. भारतावर प्रेम करणाऱ्या सर्वांना मी आवाहन करतो की, सुट्टी घेऊन इथे या, त्यांच्या पाठीशी उभे राहा.'' (Delhi News)

तत्पूर्वी शनिवारी प्रियंका गांधी या देखील कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासाठी शनिवारी सकाळी जंतरमंतरवर पोहोचल्या. यावेळी त्याच्यासोबत दीपेंद्र हुड्डाही दिसले. यावेळी प्रियंका गांधी म्हणाल्या की, ''हे खेळाडू आमचा अभिमान आहेत. ते कठोर परिश्रम आणि संघर्ष करून देशासाठी पदके जिंकतात. त्यांचे शोषण, त्यांचा अपमान हा देशातील प्रत्येक स्त्रीचा अपमान आहे. त्यांना न्याय मिळावा अशी संपूर्ण देशाची इच्छा आहे.''

Wrestlers Protest
Jammu & Kashmir News: दु:खद! जम्मू-काश्मीरच्या राजौरीजवळ रुग्णवाहिका दरीत पडली; २ जवान शहीद

दरम्यान, शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिल्ली पोलिसांनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रजभूषण सिंह यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला. दिल्ली पोलिसांनी लैंगिक छळाच्या प्रकरणात त्याच्याविरुद्ध दोन एफआयआर नोंदवले आहेत. अल्पवयीन कुस्तीपटूच्या तक्रारीवरून त्याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. देशासाठी पदक जिंकणारे सर्व मोठे कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात निदर्शने करत आहेत. त्याच्यावर महिला खेळाडूंनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.