दिल्ली-कानपूर महामार्गावर भीषण बस अपघात
ट्रकला धडक देत बस चालकाचा जागीच मृत्यू
३० ते ४० प्रवासी गंभीर जखमी
पोलिस आणि नागरिकांच्या मदतीने बचावकार्य
Delhi Kanpur National Highway Bus Accident दिल्ली-कानपूर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव वेगाने जाणाऱ्या प्रवाशांनी भरलेल्या बसचे नियंत्रण सुटून ती ट्रकला धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात बस चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर ३० ते ४० लोक गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, बसच्या आपत्कालीन दरवाज्यांमधून आणि खिडक्यांमधून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बस नाशिकहून नेपाळला जात होती. या बसमधून ४० हून जास्त प्रवासी प्रवास करत होते. आज सकाळी बस दिल्ली-कानपुर या महामार्गावर येताच चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ती ट्रकला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, बसचा चेंदामेंदा झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून ३० ते ४० जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती पोलिसांना तात्काळ देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. नागरिकांच्या मदतीने तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.
बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी बस चालकाचा मृतदेह ताब्यात घेतला असून मृताच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. पोलिस इतर संभाव्य कारणांचाही तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.