नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. अनेकांच्या बँकेंच्या खात्यातून ऑनलाईनद्वारे पैसे काढले जात आहेत. या घटनांवर आता आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) पुढील महिन्यापासून महत्त्वाचे बदल करणार आहे. RBI क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापरकर्त्यांसाठी १ ऑक्टोबरपासून कार्ड-ऑन-फाइल टोकनायझेशन नियम सुरू करणार असल्याचे सांगितले जात आहे. हा नियम लागू झाल्यानंतर तुमचे कार्ड अधिक सुरक्षित राहणार असल्याची माहिती आरहीआयने दिली आहे. (Debit Credit Card News)
या अगोदर हा नियम १ जानेवारी २०२२ पासून लागू होणार होता, पण आता आरबीआयने (RBI) ने ही मुदत ६ महिन्यांसाठी वाढवून ३० जून केली आहे. यानंतर आरबीआयने (RBI) अंतिम मुदत पुन्हा १ ऑक्टोबर २०२२ पर्यंत वाढवली. आता टोकनायझेशन सुविधा पुढील महिन्याच्या १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. आरबीआयने सर्व क्रेडिट आणि डेबिट कार्डचा डेटा ऑनलाइन, पॉइंट-ऑफ-सेल आणि अॅप-मधील व्यवहार एकत्र करून एक युनिक टोकन जारी करण्यास सांगितले आहे.
टोकनायझेशन काय आहे?
जेव्हा तुम्ही एखाद्या व्यवहारासाठी तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरता, तेव्हा व्यवहार १६-अंकी कार्ड क्रमांक, कालबाह्यता तारीख, CVV तसेच वन-टाइम पासवर्ड किंवा व्यवहार पिन यासारख्या माहितीवर आधारित असतो. जेव्हा ही सर्व माहिती योग्यरित्या प्रविष्ट केली जाते तेव्हाच व्यवहार यशस्वी होतो. टोकनायझेशन वास्तविक कार्ड तपशील "टोकन" नावाच्या युनिक पर्यायी कोडमध्ये रूपांतरित करेल. हे टोकन कार्ड, टोकन विनंतीकर्ता आणि डिव्हाइसवर अवलंबून नेहमीच युनिक असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.