Gram Panchayat Election 2022
Gram Panchayat Election 2022Saam Tv

Gram Panchayat Election 2022 : ५ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर; शिंदे गटानं खातं उघडलं

नंदुरबार जिल्ह्यातील ५ ग्रामपंचायतींचा निकाल लागला
Published on

Eknath Shinde Group Gram Panchayat Election : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर राज्यात पहिल्यांदाच ५४७ ग्रामपंचायतींच्या (Gram Panchayat) निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहेत. यासाठी आज सकाळपासूनच मतमोजणीला सुरूवात झाली असून निकालाची (Election) उत्सुकता संपूर्ण राजकीय वर्तुळात लागली आहे. अशातच नंदुरबारमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील ५ ग्रामपंचायतींचा निकाल लागला असून शिंदे गटाने विजयाचं खातं उघडलं आहे. (Nandurbar News Today)

Gram Panchayat Election 2022
Maharashtra Politics : मुंबई जिंकण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारचा नवा प्लॅन; ठाकरेंना धक्का?

नंदुरबार तालुक्यातील ५ ग्रामपंचायतीचा निकाल समोर आलाय. यामध्ये एकनाथ शिंदे गट आणि भाजपच्या युतीने विजयाचं खातं उघडलं आहे. ५ पैकी ४ ग्रामपंचायतीवर भाजपने विजय मिळवला असून एका ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा विजय झाला आहे.

राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींपैकी ५१ ग्रामपंचायतींमधील निवडणूक ही बिनविरोध झाली आहे. त्यामुळे आता उर्वरीत ५४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी रविवारी मतदान पार पडलं. या मतांची आज मोजणी केली जात आहेत. राज्यातील सत्तासंघर्षानंतर पहिल्यांदाच ग्राम पंचायतीचे निकाल लागणार असून विजयी गुलाल कोण उधळतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

Gram Panchayat Election 2022
Sanjay Raut : संजय राऊतांची सुटका होणार? जामीन अर्जावर आज सुनावणी

कोणत्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत?

पुणे जिल्हा : जुन्नर ३८, आंबेगाव १८, खेड ५, भोर २

अहमदनगर : अकोले ४५, लातूर – अहमदपूर १, सातारा – वाई १, सातारा ८ कोल्हापूर – कागल १

नाशिक जिल्हा : कळवण २२, दिंडोरी ५०, नाशिक १७

हिंगोली जिल्हा : औंढा नागनाथ ६, परभणी – जिंतूर १, पालम ५

नांदेड जिल्हा : माहूर २४, किनवट ४७, अर्धापूर १, मुदखेड ३, नायगाव खैरगाव ४, लोहा ५, कंधार ४, मुखेड ५, देगलूर १

धुळे जिल्हा : शिरपूर ३३

नंदुरबार जिल्हा : शहादा ७४, नंदुरबार ७५

जळगाव जिल्हा : चोपडा ११, यावल २

बुलढाणा जिल्हा : जळगाव जामोद १, संग्रामपूर १, नांदुरा १, चिखली ३, लोणार २

अकोला जिल्हा : अकोट ५, बाळापूर १

वाशिम जिल्हा : कारंजा ०४

अमरावती जिल्हा : धारमी १, तिवसा ४, अमरावती १, चांदूर रेल्वे १, यवतमाळ जिल्हा, बाभुळगाव २, कळंब २, यवतमाळ ३, महागाव १, आर्णी ४, घाटंजी ६, केळापूर २५, राळेगाव ११, मोरेगाव ११, झरी जामणी ८

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com