Onion Storage : कांदा पुन्हा रडवणार ? अधिक काळ टिकवण्यासाठी 'या' टिप्सचा वापर करा

कांदा अधिक काळ टिकवण्यासाठी या टिप्स फॉलो करा.
Onion Storage
Onion StorageSaam TV
Published On

Onion Storage : नियमित जेवणातला महत्त्वाचा भाग असलेला कांदा आता सर्वसामान्यांना रडवण्याची दाट भीती व्यक्त केली जातेय. ऑक्टोबरमध्ये कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे.

आपल्या स्वयंपाकघरात अधिक प्रमाणात वापरला जाणारा पदार्थ अर्थात कांदा (Onion). कांद्याचा उग्रवास आपल्याला आवडत नाही परंतु, त्याच्या शिवाय जेवणाला चव देखील येत नाही.

Onion Storage
Workout Tips : महिलांनी 'या' काळात करु नये वर्कआउट, अन्यथा...

याचा वापर वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. अनेकजण भाजीत कांदा घालून बनवतात, तर अनेकजण कांदा मसाला करून भाजी बनवतात. काहींना सॅलडमध्ये कांदा खायलाही आवडतो.

ज्यांच्या घरात (Home) कांद्याचा वापर जास्त केला जातो, ते एकाच वेळी मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी करतात, पण जास्त काळ नीट साठवून न ठेवल्यास कांदे लवकर खराब होतात. तुम्हाला या समस्येचा सामना आता करावा लागणार नाही, म्हणून आज आम्ही तुम्हाला कांद्याची साठवणूक करण्याचा योग्य आणि सोपा मार्ग सांगणार आहोत, ज्यामुळे कांदे महिनाभर खराब होणार नाही.

१. कांदा कोरड्या जागी ठेवा

कांदा साठवण्यासाठी तो स्वच्छ आणि कोरड्या जागी ठेवा. विशेषत: जेव्हा तुम्हाला कांदे जास्त काळ साठवायचे असतात तेव्हा हे करा. तसेच, कांदे ताजे ठेवण्यासाठी, आपण त्यांना चांगल्या वेंटिलेशनसह कोरड्या जागी ठेवावे. ही पद्धत कांद्याचे शेल्फ लाइफ वाढवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

Onion Storage
Onion Benefits : कांद्याचे अनेक फायदे, जळजळीवर तर बहुगुणी !

२. थंड ठिकाणी ठेवा

कांदा जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी तो थंड जागी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही ज्या ठिकाणी कांदा साठवत आहात त्या ठिकाणाचे तापमान ४०-५० अंशांच्या आसपास असावे. हे तापमान कांदा साठवण्यासाठी निरोगी तापमान मानले जाते. या तापमानात न ठेवल्यास त्यात ओलावा निर्माण होतो व कांद्याला बुरशी लागून तो खराब होतो.

३. अंधाऱ्या जागी साठवा

कांदे थंड, कोरड्या आणि गडद ठिकाणी दीर्घकाळ ताजे ठेवता येतात. कांदा साठवण्यासाठी अंधाराचे ठिकाणे सर्वोत्तम आहेत.

Onion Storage
Beetroot Raita Recipe : बीटाचा रायता आहे आरोग्यासाठी फायदेशीर ! जाणून घ्या, कसा बनवायचा

४. नायलॉन स्टॉकिंग्जमध्ये कांदा साठवा

कांदा जास्त काळ साठवायचा असेल तर नायलॉन स्टॉकिंग्जमध्ये कांदा साठवून ठेवता येतो. कांदा जास्त काळ ताजे ठेवण्याचा हा उत्तम उपाय आहे.यासाठी प्रथम कांदा घ्या आणि कोरडा होऊ द्या. कांदे सुकले की नायलॉन स्टॉकिंग्जमध्ये कांदे साठवा. असे कांदे साठवून ठेवल्याने कांदे जास्त काळ खराब होत नाहीत

५. बादल्यांमध्ये कांदा साठवा

प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून फ्रिजमध्ये ठेवण्यापेक्षा कांदा बादलीत ठेवणे हा एक चांगला मार्ग आहे. प्लास्टिकच्या पिशवीत ठेवल्याने कांद्याची गुणवत्ता खराब होते, तसेच फ्रीजमध्ये असलेल्या इतर भाज्याही त्याच्या संपर्कामुळे खराब होतात. कांदा बादलीत साठवायचा नसेल तर जाळीच्या पिशवीत किंवा बांबूच्या डब्याचा वापर आपण करू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com