कोमल दामुद्रे
कांद्यात नैसर्गिक साखर, व्हिटॉमिन ए, सी आणि ई भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय यात मिनरल्स, सोडिअम, पोटॅशिअम आणि फायबर्सचेही मुबलक प्रमाण असते.
कांद्यात अँटी बायोटिक, अँटी सेप्टिक आणि अँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात. त्यामुळे शरीरात होणारे इंफेक्शन दूर होते.
कांद्याचे सेवन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचे काम करते.
कांद्याच्या कूलिंग इफेक्टमुळे उन्हाळ्यात त्याचे सेवन केल्याने आपल्याला थंडावा मिळतो, उन्हाळ्यात शरीराचे तापमान सामान्य राहण्यास मदत होते.
उन्हाळ्यात उष्मा येण्याची शक्यता खूप जास्त असते, यामुळे तुम्ही गंभीर आजारी पडू शकता. अशा परिस्थितीत कांद्याचे सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
कांदा आणि लसूण यांसारख्या एलिअम भाज्यांचे सेवन केल्याने कॅन्सर होण्याची शक्यता बर्याच प्रमाणात कमी होते.
कांद्यामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स तुम्हाला जळजळीशी लढण्यास आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात