आणखी एक विमान अपघात! लँड करताच दुसऱ्या विमानाला धडकलं; स्फोटामुळे हवेत आगीचा लोट, थरारक VIDEO व्हायरल

Deadly Plane Crash in Montana: मोंटाना येथील कॅलिस्पेल सिटी विमानतळावर दोन विमाने धडकली. भीषण धडकेनंतर विमानतळावर मोठी आग लागली. घटनेनंतर विमानतळावर गोंधळ व धुराचे लोट पसरले.
Deadly Plane Crash in Montana
Deadly Plane Crash in MontanaSaam TV News
Published On
Summary
  • मोंटाना येथील कॅलिस्पेल सिटी विमानतळावर दोन विमाने धडकली.

  • भीषण धडकेनंतर विमानतळावर मोठी आग लागली.

  • घटनेनंतर विमानतळावर गोंधळ व धुराचे लोट पसरले.

  • बचाव पथकांनी तातडीने आग विझवण्याचे कार्य सुरू केले.

अमेरिकेत एक भीषण विमान अपघात घडला. दोन विमानांची एकमेकांना टक्कर झाली. ही घटना अमेरिकेतील मोंटाना राज्यातील कॅलिस्पेल सिटी विमानतळावर घडली आहे. लँडिंगदरम्यान छोटे विमान धावपट्टीवर उभ्या असलेल्या दुसऱ्या विमानाला धडकले. या जोरदार धडकेनंतर मोठी आग लागली आणि विमानतळावर काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. हवेत धुराचे लोट पसरले होते. घटनेनंतर बचावपथकाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

नेमकं काय घडलं?

दुपारी २ वाजेच्या सुमारास एक छोटे सिंगल इंजिन विमान (सोकाटा टीबीएम ७०० टर्बोप्रॉप) चार जणांसह कालिस्पेल सिटी विमानतळावर उतरत होते. लँडिंगदरम्यान, विमान पार्क केलेल्या विमानाशी आदळले. टक्कर झाल्यानंतर, प्रचंड स्फोट झाला आणि भीषण आग लागली. काही वेळातच आगीच्या ज्वाला उसळल्या. या विमान अपघातामुळे काही काळ विमानतळावर गोंधळ उडाला होता.

Deadly Plane Crash in Montana
खोटं धर्मांतरण करून दुसरं लग्न, पोलीस कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फ; धुळ्यात खळबळ

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, 'विमान धावपट्टीच्या शेवटी कोसळले होते. लँड करताच दुसऱ्या विमानाला आदळले. विमान आदळल्यानंतर काही क्षणात हवेत आगीचे लोट पसरले. दरम्यान, आग लागल्यानंतर पायलट आणि तीन प्रवासी बाहेर पडण्यात यशस्वी झाले. या भयंकर विमान अपघातात २ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून, त्यांच्यावर सध्या जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत'.

Deadly Plane Crash in Montana
लाडकी बहीण योजनेच्या पैशातून सुरू केला बिझनेस; एकनाथ शिंदेंही इम्प्रेस; किती होते कमाई?

या भीषण विमान अपघातात सुदैवानं कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. प्रवाशांना किरकोळ जखम झाली आहे. अपघात घडल्यानंतर बचावपथकानं तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच विमानातील प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न केला. सध्या या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत असून, या व्हिडिओतून अपघाताची तीव्रता दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com