
नवी दिल्ली : अमेरिकेची राजधानी वॉशिंगटन डीसीच्या रीगन नॅशनल विमानतळाजवळ अमेरिकेचे एअरलाइन्सचं विमान आणि हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातानंतर विमान आणि हेलिकॉप्टरचे तुकडे झाले. या भीषण अपघातात ६८ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
वॉशिंगटन डीसीच्या 'फायर' प्रमुखांनी सांगितलं की, 'विमान आणि हेलिकॉप्टरच्या धडकेनंतर झालेल्या अपघातात ६७ जणांचा मृत्यू झाला. या अपघातामधून एकही जण बचावला नाही. वॉशिंगटन डीसी फायर अँड ईएमएसचे प्रमुख जॉन डोनली यांनी सांगितलं की,'आम्ही लोक रेस्क्यू ऑपरेशनला आता रिकव्हरी ऑपरेशनमध्ये बदलत आहोत. या भीषण अपघातात एकही जण बचावला नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या ईगल विमान आणि ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. रीगन विमानतळाजवळ हा भीषण अपघात झाला. विमानातील सर्व प्रवासी आणि चालक टीममधील सर्व सदस्यांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातानंतर रेस्क्यू टीम रिकव्हरी ऑपरेशनच्या मागे लागली आहे. सुरुवातीला रेस्क्यू पथकाने १९ मृतदेह बाहेर काढले होते.
मीडिया रिपोर्टनुसार, या विमानाची प्रवासी क्षमता ६५ जणांची होती. अपघातावेळी विमानात ६४ प्रवासी होते. या अपघातात हेलिकॉप्टरमधील तिघांचा मृत्यू झाला आहे. विमानाचं लँडिग होताना हा अपघात झाला आहे. या विमानाने अमेरिकी सैन्य दलाच्या ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. विमान आणि हेलिकॉप्टर एकमेकांना धडकून पोटोमॅक नदीत कोसळले.
भीषण अपघातानंतर विमान आणि हेलिकॉप्टर नदीत कोसळलं. विमानामध्ये एकूण ६४ प्रवासी होते. या अपघाताताची माहिती मिळताच घटनास्थळी मदतकार्य सुरु करण्यात आलं. हेलिकॉप्टरला विमानाने धडक दिली, ते हेलिकॉप्टर अमेरिकेच्या सैन्य दलाचे होते. या अपघातानंतर विमानतळ तातडीने बंद करण्यात आलं. अपघाताची घटना घडलेलं विमानतळ आणि व्हाइट हाऊसमध्ये फक्त ३ किलोमीटरचे अंतर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.