
Saudi Arabia Road Accident News : सौदी अरेबियातून मोठा अपघात घडला आहे. या अपघातामध्ये नऊ भारतीयांचा मृत्यू झाला. सौदी अरेबियाच्या पश्चिमेकडील जीझानजवळील रस्त्यावर हा अपघात झाला आहे. या नागरिकांच्या कुटुंबीयांशी संपर्क केला जात आहे. या घटनेवर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी हळहळ व्यक्त केली आहे.
आज (२९ जानेवारी) सौदी अरेबियाच्या सौदी अरेबियाच्या पश्चिम प्रदेशातील जिझानजवळ रस्त्यावर अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये ९ भारतीय नागरिकांनी त्यांचा जीव गमवावा लागला. शिवाय अनेकजण जखमी देखील झाले. घटनास्थळी बचावकार्याला सुरुवात झाली आहे.
सौदी अरेबियाच्या जेद्दाहमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने यासंदर्भात माहिती एक्स या सोशल मीडिया साईटवर पोस्ट केली आहे. 'जिझानजवळच्या दुर्घटनेमुळे आम्ही दु:खी आहोत. जेद्दाहमधील भारतीय वाणिज्य दूतावास पूर्ण सहकार्य करत आहे. दूतावासातील अधिकारी हे पीडित नागरिकांचे कुटुंबीयाच्या संपर्कात आहेत' असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. शिवाय पोस्टमध्ये काही हेल्पलाईन नंबर देखील देण्यात आले आहेत.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही या अपघातावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, घडलेली अपघाताची दुर्घटना वेदनादायक आहे. जेद्दाहमधील आमच्या कौन्सुल जनरलशी संवाद झाला आहे. त्यांनी संंबंधितांच्या कुटुंबाशी संपर्क साधण्यात आला आहे. जनरल या घटनेमधील पीडितांना संपूर्णपणे सहकार्य करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.