

CTET 2023 Exam Date Announced: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सीटीईटी (CTET) संदर्भात महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. सीबीएसईने (CBSE) सीटीईटी परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. यासोबतच यापुढे परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसईने जारी केलेल्या सूचनेनुसार, यावर्षी सीटीईटी परीक्षा 20 ऑगस्ट 2023 रोजी होणार आहे. विशेष म्हणजे परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार नसून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाऊन लिखित परीक्षा द्यावी लागणार आहे.
सीबीएसईने जारी केलेल्या सूचनेमध्ये असे म्हटले आहे की, 'केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या 17 व्या आवृत्तीसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना सूचित केले जाते की सीटीईटी परीक्षा 20 ऑगस्ट 2023 रोजी ऑफलाइन पद्धतीने म्हणजेच पेन आणि पेपर आधारित पद्धतीने घेतली जाईल.' (Latest Marathi News)
येथे तपासा अभ्यासक्रम
सीबीएसईने सीटीईटी परीक्षेचा अभ्यासक्रम, पात्रता आणि इतर माहिती आधीच प्रसिद्ध केली आहे. सीटीईटी परीक्षेसाठी जारी केलेली माहिती बुलेटिन अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवार येथून सर्व तपशील पाहू शकतात.
सीटीईटी परीक्षा 2 सत्रात घेतली जाणार आहे. परीक्षा सकाळी 9.30 ते दुपारी 12 आणि दुपारी 2.30 ते 5 या वेळेत होणार आहे. त्याचे प्रवेशपत्र नियोजित वेळी दिले जाईल. जे उमेदवारांना परीक्षा हॉलमध्ये न्यावे लागते. यापूर्वी 27 एप्रिल ते 26 मे या कालावधीत अर्ज प्रक्रिया पार पडली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.