जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टो करंसीच्या (Cryptocurrency Hacking) चोरीचा मामला आता समोर आला आहे. क्रिप्टो करंसी ट्रांसउरिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या पॅाली नेटवर्क (Polly Network) कंपनीने मंगळवारी सांगितल्यानुसार काही हॅकर्सनी त्यांची सिस्टीम हॅक करुन 600 मिलीयन डॅालर म्हणजेच जवऴपास 4468 कोटी रुपयांची क्रिप्टो करंसी चोरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही इतिहासातील सर्वात मोठी क्रिप्टो करंसी चोरी असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान या घटनेनंतर पॅाली नेटवर्कने इथेरियम, बायनान्स चेन आणि ऑक्सपॅालिगन टोकन असलेल्या ट्रेडर्सना, हे कॅाइन सोडण्याची अपील केली आहे.
कंपनीने अनेक ट्विट करत माहिती दिली आहे. कंपनीने सांगितल्यानुसार, हॅकर्सनी पॅाली नेटकर्वच्या सिस्टीममध्ये घुसून मोठ्या प्रमाणात क्रिप्टो करंसी आपल्या अकांउंटमध्ये टॅांसफर केली आहे. कंपनीने हॅकर्सने वापरलेले ऑनलाइन अॅड्रेस अधिकृत ट्विटर अकाउंट शेअर केले आहेत. या हॅकिंगनंतर त्यांना ब्लॅाकलिस्ट करण्यास सांगितले आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.