Nasal Vaccine in India: Nasal व्हॅक्सिनला मंजुरी, कुठे आणि कुणाला घेता येईल?

Nasal Vaccine News Update : कोरोना विषाणूविरुद्धच्या लढ्यासाठी भारताच्या हाती आणखी एक महत्वाचं शस्त्र सापडलं आहे. Nasal Vaccine ला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे.
Nasal Vaccine in India Latest Update
Nasal Vaccine in India Latest UpdateSAAM TV

Nasal Vaccine News Update : कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्यासाठी आणि त्याचा नायनाट करण्यासाठी भारताला आणखी एक महत्वाचं शस्त्र सापडलं आहे. चीनमध्ये कोरोनाची लाट सुरू असतानाच, भारत बायोटेकनं विकसित केलेल्या नेजल व्हॅक्सिनला (Nasal Vaccine) केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे.

ही नेजल लस नाकावाटे दिली जाते. नाकात दोन थेंब टाकल्यास कोरोनाचा संसर्ग रोखता येतो. ही लस आज म्हणजेच शुक्रवारपासून लसीकरण मोहीमेंतर्गत दिली जाणार आहे. कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड लशीचे डोस घेतलेल्या नागरिकांना ही लस घेता येऊ शकते. (Corona Latest Update)

Nasal Vaccine in India Latest Update
Corona Update: मास्कची सक्ती करायची की नाही; कसे ठरवते केंद्र सरकार? तज्ञ काय म्हणतात जाणून घ्या...

नेजल लस कुठे उपलब्ध होणार?

केंद्रीय आरोग्य मंत्री (Health Minister) मनसुख मांडविया यांनी गुरुवारी राज्यसभेत सांगितलं की, तज्ज्ञांच्या समितीनं नेजल व्हॅक्सिनच्या (Nasal Vaccine) वापराला मंजुरी दिली आहे. कोविन अॅपवर आजपासून भारत बायोटेकच्या (bharat biotech) या लशीचा अंतर्भाव करण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

सध्याच्या घडीला खासगी रुग्णालयांतच ही लस उपलब्ध होणार आहे. सरकार लवकरच ही लस सरकारी रुग्णालये आणि बाजारात उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे. या लशीला मंजुरी मिळाल्याने डोस (Covid 19 Vaccine) घेण्यासाठी कुणालाही इंजेक्शन टोचून घेण्याची आवश्यकता नाही. नाकात दोन थेंबांची लसही घेऊ शकतात.

Nasal Vaccine in India Latest Update
Coronavirus : वाढत्या कोरोनाला घाबरुन तुम्ही सतत गरम पाणी पिताय ? जडू शकतो गंभीर आजार, यासाठी योग्य पर्याय कोणता ?

दरम्यान, गेल्या महिन्यात भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडनं नाकावाटे दिली जाणारी इनकोवॅक लशीसंदर्भात केंद्र सरकारशी संपर्क साधला होता. नोव्हेंबरमध्ये भारत बायोटेकने केंद्र सरकारकडे नाकावाटे दिली जाणारी कोविड प्रतिबंधक लस इनकोवॅकला कोविन पोर्टलवर उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. कारण ही लस घेणाऱ्यांना लसीकरणाचे प्रमाणपत्र मिळू शकेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com