Corona Update: मास्कची सक्ती करायची की नाही; कसे ठरवते केंद्र सरकार? तज्ञ काय म्हणतात जाणून घ्या...

केंद्र सरकार कोरोना वापरा किंवा वापरु नका हे कशाच्या आधारे ठरवते असा प्रश्न अनेकांना पडतो.
corona mask
corona mask
Published On

Corona News: दोन वर्षापुर्वी देशभरात कोरोनाने भारतात प्रचंड थैमान माजवले होते. या काळात सामान्य जनतेचे प्रचंड हाल तर झालेच त्याचबरोबर असंख्य उद्योगधंंदेही बंद पाडले. कोरोनाच्या संकटातून देश सावरत असतानाच पुन्हा एकदा या रोगाने डोके वर काढले आहे. चीन, अमेरिकेत कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे खबरदारी देशात पुन्हा मास्क सक्ती होऊ शकते.

कोरोना (Corona) काळात होणारी मास्क सक्ती केंद्र तसेच राज्य सरकारकडून केली जाते. मात्र केंद्र सरकार कोरोना वापरा किंवा वापरु नका हे कशाच्या आधारे ठरवते असा प्रश्न अनेकांना पडतो. जाणून घेवूया कसा ठरवला जातो मास्क सक्तीचा निर्णय.

corona mask
Amaravati News: पदभार स्वीकारण्या आधीच गाव स्वच्छता; नवनियुक्‍त सरपंच सदस्यांचा पुढाकार

कोरोनाने चीनमध्ये पुन्हा हाहाकार माजवल्याने भारतातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. केंद्रिय आरोग्यमंत्र्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित कोरोना नियमांचे पालन करण्याची सुचना दिली आहे. त्यामुळे मास्क सक्ती होण्याची शक्यता आहे. पाहूया मास्क सक्तीची सुचना कशाच्या आधारे केली जाते.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या तज्ञ डॉक्टरांनी याबाबत माहिती दिली आहे. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, मास्क सक्तीची किंवा मास्क न वापरण्याची सुचना ही कोरोना संसर्गाच्या प्रभावावरुन ठरवली जाते. या वायरसचा देशात प्रभाव कसा आहे, संसर्ग वेगाने होत आहे की सामान्य स्थिती आहे यावरुन केंद्र सरकार निर्णय घेते. सध्या देशात कोरोना नियंत्रित असल्याने मास्क सक्तीचा आदेश नाही. मात्र कोरोनाच्या केसेस वाढल्या आणि राज्यांमध्ये संसर्गाचा वेग जास्त असला तर केंद्र सरकार मास्क सक्ती करु शकते.

corona mask
Kisan Diwas 2022: 'राष्ट्रीय शेतकरी दिन' का साजरा करतात? कोण होते चौधरी चरण सिंग? जाणून घ्या किसान दिनाचे महत्व

तज्ञांच्या म्हणण्यानुसार, सध्या चीनमध्ये (China) वाढता कोरोना पाहता देशात सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. सरकारने मास्कची सक्ती नसली तरी लोकांनी काळजी घेतली पाहिजे. सुरक्षित अंतर ठेवले पाहिजे. सध्या लोकांनी स्वतः काळजी घेणे हाच कोरोनासाठीची खबरदारी आहे. सध्या भारतात कोरोनाची परिस्थिती सामान्य आहे. त्यामुळे मास्कची सक्ती नाही, मात्र संसर्ग वाढल्यास पुन्हा मास्क सक्ती होऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com