Kisan Diwas 2022: 'राष्ट्रीय शेतकरी दिन' का साजरा करतात? कोण होते चौधरी चरण सिंग? जाणून घ्या किसान दिनाचे महत्व

कृषीप्रधान भारतात २३ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय किसान दिन म्हणून साजरा केला जातो.
farmer
farmerSaam TV
Published On

National Farmers Day 2022: भारत (India) हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. शेती व्यवसायाला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखले जाते. भारतात प्रत्येक राज्यात शेती हा प्रमूख व्यवसाय आहे. शेतीप्रधान भारतात २३ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय किसान दिन म्हणून साजरा केला जातो.

या दिवशी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांची, शेती व्यवसायासमोरील आव्हानांची चर्चा केली जाते. शेतकरी दिवस कधीपासून साजरा करण्यात आला? काय आहे यामागचा इतिहास चला जाणून घेवू.

farmer
Karnataka CM on Sanjay Raut: संजय राऊतांच्या वक्तव्याने कर्नाटकला मिरच्या झोंबल्या; थेट विधानसभेत पडसाद

कृषीप्रधान भारतात २३ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय किसान दिन म्हणजेच शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. आपल्या कार्यकाळात चौधरी चरण सिंग यांनी शेतीव्यवसायासाठी अनेक चांगल्या योजना राबवल्या होत्या. त्यांनी आपल्या कार्यकाळात शेतकरी हिताचे अनेक महत्वपुर्ण निर्णय घेतले.

शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेती व्यवसायासाठी घेतलेल्या या निर्णयांमुळे, त्यांच्या काळात राबवलेल्या कौतुकास्पद निर्णयामुळे चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस राष्ट्रीय किसान दिन म्हणून साजरा केला जातो.

farmer
Beed News: कर्नाटकला जाण्यासाठी प्रवाशांची तोबा गर्दी; बसमध्ये १०० प्रवाशांचा धोकादायक प्रवास

शेतकरी दिवसाचे महत्व काय?

राष्ट्रीय किसान दिन म्हणजेच शेतकरी दिनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. विविध सरकारी योजनांची, शेतकरी हिताच्या निर्णयांची या दिवशी घोषणा केली जाते. तसेच विविध कार्यक्रमांमधून, स्पर्धा, व्याख्याने, इ.मधून शेतकरी आणि शेती व्यवसायाबद्दल जनजागृती केली जाते. तसेच शासकीय कार्यालयांमध्ये विविध स्पर्धा आणि शेतकरी प्रदर्शनही भरवले जाते.

कोण होते चौधरी चरण सिंग?

चौधरी चरण सिंग यांचा जन्म २३ डिसेंबर १९०२ मध्ये एका शेतकरी कुटूंबात झाला. शेतकरी कुटूंबात जन्मल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची, त्यांच्या समस्यांची जाणीव होती. याच जाणीवेतून त्यांनी आपल्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या लोकसभेत मांडल्या. त्यामुळेच ते शेतकरी नेते म्हणून ओळखले जाऊ लागले.

चौधरी चरण सिंग हे 28 जुलै 1979 पासून ते 14 जानेवारी 1980 या काळात देशाचे पंतप्रधान होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी देशातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या संदर्भातील सुधारणांबाबतचे बिल सादर करत कृषी क्षेत्रात आपली भूमिका ठामपणे मांडली होती. चौधरी चरण सिंग यांचं 29 मे 1987 मध्ये निधन झाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com