Coronavirus
CoronavirusSaam Tv

Coronavirus : वाढत्या कोरोनाला घाबरुन तुम्ही सतत गरम पाणी पिताय ? जडू शकतो गंभीर आजार, यासाठी योग्य पर्याय कोणता ?

कोरोनाचे नाव ऐकताच बहुतेक लोक पुन्हा पुन्हा उकळलेले पाणी पिण्यास सुरुवात करत आहेत.
Published on

Coronavirus : चीनपासून संपूर्ण जगामध्ये कोरोनाचे नवीन प्रकार पुन्हा एकदा कहर करत आहेत. एकीकडे चीनमध्ये दररोज लाखो केसेस येत आहेत, तर दुसरीकडे भारतातील लोकांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. कोरोनाचे नाव ऐकताच बहुतेक लोक पुन्हा पुन्हा उकळलेले पाणी पिण्यास सुरुवात करत आहेत. त्यांना वाटते की गरम पाणी प्यायल्याने कोरोना पूर्णपणे नाहीसा होईल.

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की असे करणे तुमच्या आरोग्यासाठी (Health) खूप हानिकारक ठरू शकते. त्यामुळे तुमचे आरोग्यही बिघडू शकते. ही गोष्ट तुम्हाला नक्कीच तुम्हाला माहित नसेल परंतु, हे सत्य आहे आणि अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे. याचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो हे जाणून घेऊया

Coronavirus
COVID-19 : प्रेग्नेंसीच्या काळात 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका, आई आणि बाळाला होऊ शकते संक्रमण !

1. मूत्रपिंडावर परिणाम होतो

मूत्रपिंडात एक विशेष केशिका प्रणाली आहे. ज्याचे काम शरीरातील अतिरिक्त पाणी आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकणे आहे. संशोधनानुसार, जर तुम्ही खूप गरम पाणी प्यायले तर किडनीचे कार्य करण्यासाठी अनेक समस्या निर्माण होतात.

2. झोपेचा अभाव

रात्री झोपताना कोमट पाणी पिणे तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे, परंतु जर तुम्ही खूप गरम पाणी प्यायले तर ते तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकते. यामुळे तुमची रात्रीची झोप खराब होऊ शकते. गरम पाणी प्यायल्याने तुम्हाला रात्रीच्या वेळी शौचालयाचा त्रास होतो. यामुळे तुमच्या रक्ताभिसरणावर ताण पडतो. झोपताना चुकूनही गरम पाणी पिऊ नका.

3. रक्ताभिसरणाची समस्या

जास्त गरम पाणी पिणे रक्ताभिसरणासाठी खूप हानिकारक आहे. जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील रक्त वाढते. उच्च रक्तदाब आणि इतर प्रकारच्या कार्डिओ संबंधित समस्या होऊ शकतात.

Hot Drink
Hot Drink Canva

4. नसांमध्ये जळजळ

असे अनेक लोक आहेत जे तहान न लागता पाणी (Water) पितात, मग त्यांच्या नसा सुजतात. त्यामुळे तहान लागल्यावरच पाणी प्यावे. पुन्हा पुन्हा गरम पाणी प्यायल्याने डोकेदुखीचा त्रास होतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com