सावधान! कोरोनाचा वेग वाढतोय; देशातील 24 तासांतील आकडेवारी उरात धडकी भरवणारी

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एका दिवसात 15 जणांचा मृत्यू झाला आहे.
Corona News Update
Corona News Update Saam Tv

नवी दिल्ली : देशात कोरोना (Corona) व्हायरचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे चौथी लाट येते की काय? अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. चिंताजनक बाब म्हणजे दिवसागणिक कोरोनाचे (corona new patients) तब्बल 8 हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहे. आता गेल्या 24 तासांची आकडेवारी केंद्र सरकारने जाहीर केली असून, त्यातही हेच चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे तब्बल 8 हजार 822 नवे रुग्ण आढळले आहेत. (Corona Virus Latest News in India)

Corona News Update
शेतकऱ्यांनो... पेरणी कधी कराल?; अकोला कृषी विद्यापीठाने दिला महत्वाचा सल्ला

चिंताजनक बाब म्हणजे 24 तासांत आढळून आलेली कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी ही गेल्या तीन महिन्यांतील सर्वाधिक आकडेवारी असल्याचं समोर आलं आहे. मंगळवारी आढळलेल्या प्रकरणांपेक्षा हे प्रमाण 33.8 टक्के अधिक आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एका दिवसात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या आता 53,637 इतकी झाली आहे. (Corona News Update)

सलग 3 दिवसांपासून दररोज 8 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत असली तरी, मंगळवारी नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळाली होती. मंगळवारी देशभरात कोरोनाचे 6 हजार 594 नवीन रुग्ण आढळून आले होते. यापूर्वी सोमवारी 8,084 नवीन रुग्ण आढळले होते. त्याआधी, 10 जून रोजी 8,328 आणि 11 जून रोजी 8,582 नवीन प्रकरणे नोंदवली गेली होती.

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 5,718 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. नवीन कोरोना प्रकरणांनंतर, कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 4,32,45,517 वर पोहोचली आहे, तर एकूण बरे झालेल्यांची संख्या 4,26,67,088 आहे. कोरोनामुळे एकूण मृत्यूंची संख्या 5,24,792 वर पोहोचली आहे. देशात लसीकरणही वेगाने सुरू आहे. आतापर्यंत एकूण 1,95,50,87,271 लसीकरण करण्यात आले आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com