India Corona Update: कोरोनाचा उद्रेक कायम, 24 तासात 2,68,833 नवे रुग्ण

भारतात गेल्या 24 तासात कोरोनाचे 2,68,833 नवे रुग्ण आढळून आले आहेत. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी 4631 कोरोना रुग्ण वाढले आहेत. तर, गेल्या 24 तासात 402 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, या कालावधीत 1,22,684 जण संसर्गातून बरे झाले आहेत.
India Corona Update
India Corona UpdateSaam Tv
Published On

नवी दिल्ली: देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच कोरोनच्या नव्या ओमिक्रॉन (Omicron) या व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. भारतात गेल्या 24 तासात कोरोनाचे 2,68,833 नवे रुग्ण आढळून आले आहेत. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी 4631 कोरोना रुग्ण वाढले आहेत. तर, गेल्या 24 तासात 402 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, या कालावधीत 1,22,684 जण संसर्गातून बरे झाले आहेत. तर, नवीन प्रकरणांनंतर सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 14,17,820 झाली आहे. दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट वाढून 16.66 टक्के इतका झाला आहे. (India Corona Latest News Update)

सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात

राज्यात गेल्या 24 तासात 43,211 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 71,24,278 कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. तसेच 33,356 रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 67,17,125 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

गेल्या 24 तासात 19 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 1,41,756 रुग्णांना कोरोनामुळे आपला जिव गमवावा लागला आहे. सध्या राज्यात 2,61,658 रुग्ण अॅक्टीव आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांनी कोरोनाची तिसरी लाट जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात कमी होईल असे संकेत देखील दिले आहेत.

India Corona Update
Beed Crime: पोलीसांची अब्रू चव्हाट्यावर! रिक्षा, जीप चालकांकडून हप्ता वसुलीचा व्हिडिओ व्हायरल...

ओमिक्रॉन संसर्गाची परिस्थिती

देशात कोव्हिड-19 च्या ओमिक्रॉन या नवीन प्रकाराने संक्रमित लोकांची संख्या देखील वेगाने पसरत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, या व्हेरिएंटच्या 6,041 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यता २४ तासात राज्यात 238 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वाधिक 197 रुग्णांची पुण्यात नोंद झाली झाले. आतापर्यंत राज्यात 1605 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे तर 859 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे.

Edited By - Shivani Tchkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com