Child Marriage : मुलींच्या लग्नाचं वय फक्त ९ वर्ष; इराकच्या विधेयकावर गदारोळ, नेमकं काय आहे प्रकरण?

Legal age of girls marriage 9 years Proposal : मुलींच्या लग्नाचं वय कायद्याने १८ वर्ष आहे. परंतु इराकमध्ये मुलींचं लग्नाचं वय ९ वर्ष करण्यात यावं, असा प्रस्ताव मांडला जातोय.
मुलींच्या लग्नाचं वय
Child MarriageSaam Tv
Published On

मुंबई : मुलीच्या लग्नाच्या वयाच्या कायद्यातील तरतुदीसंदर्भात मोठी बातमी आहे. सध्या कायद्याने १८ वर्ष मुलींचं लग्नाचं वय ठेवण्यात आलंय. परंतु आता इराकमध्ये मात्र मुलींच्या लग्नाचं वय ९ वर्ष करावं, अशी मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे इराकमध्ये प्रस्तावित कायद्यावर गोंधळ मोठा गोंधळ उडाला आहे. आपण यासंदर्भात सविस्तर जाणून घेवू या.

मुलीच्या लग्नाचं वय

मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेतील देशांपैकी इराकमध्ये काम करणाऱ्या महिलांची संख्या सर्वात कमी म्हणजे फक्त १ टक्का आहे. या आकडेवारीवरून तिथल्या महिलांची स्थिती फारशी चांगली नसल्याचं दिसून (Iraq Child Marriage) येतंय. कौटुंबिक हिंसाचारापासून ते अल्पवयीन विवाहापर्यंत सर्व गोष्टींना महिला तोंड देत आहेत. अशा परिस्थितीत इराक आता एक नवीन विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. या नव्या विधेयकानुसार मुलींच्या लग्नाचं वय कायदेशीररित्या ९ वर्ष असणार आहे. आता यावरून इराकमध्ये वातावरण तापलंय.

इराकमध्ये वातावरण तापलं

इराकमध्ये मुलींचे लग्नाचे वय १८ वर्षावरून ९ वर्ष करण्याची योजना आखली जातेय. हा कायदा पारित झाल्यास १५ वर्षांचा मुलगा ९ वर्षाच्या मुलीशी लग्न करू शकतो. या विधेयकाविरोधात इराकमध्ये निदर्शने सुरू (Child Marriage) आहेत. मिडल ईस्ट आयच्या म्हणण्यानुसार, पर्सनल स्टेटस अॅक्ट १९५९ चा नियम १८८ बदलण्याची चर्चा सुरू आहे. जुना कायदा अब्दुल करीम कासिम सरकारने केला होता. त्यांनी मुलींचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यावरच लग्न करण्याचा नियम पारित केला होता. या नियमामध्ये पुरुष त्यांच्या इच्छेनुसार दुसरे लग्न करू शकत नाहीत, असं देखील नमूद करण्यात आलं होतं.

मुलींच्या लग्नाचं वय
Marriage Tips: नवरा-बायकोच्या वयात किती अंतर असले पाहिजे?

नवीन कायदा कोण आणत आहे?

शिया इस्लामी पक्षांनी मिळून एक नवीन विधेयक तयार केलंय. यामध्ये मुलींच्या लग्नाचं वय बदलण्याची चर्चा आहे. सध्या इराकमध्ये मोहम्मद शिया अल-सुदानी यांचं सरकार आहे. ते स्वतः शिया आहेत. त्यांना शिया पक्षांचा पाठिंबा ( Marriage Legal Age) आहे. शियाबहुल देशाच्या सरकारमध्ये शिया पक्षांची मोठी भूमिका आहे. ते अनेकदा मोठे निर्णय घेतात.

विधेयकात नेमकं काय आहे?

प्रस्तावित विधेयकात पती-पत्नीला वैयक्तिक समस्या सोडवण्यासाठी सुन्नी किंवा शिया यापैकी एकाची निवड करावी लागेल. विवाह करारात कोणता धर्म पाळायचा? याबाबत वाद असल्यास पतीच्या धर्मानुसार कराराचा विचार केला जाईल. शिया कायदा जाफरी कायद्यावर आधारित असेल. तो विवाह, घटस्फोट, मूल दत्तक आणि वारसा यासारख्या बाबी (age of girls marriage 9 years) हाताळतो. या अंतर्गत ९ वर्षांच्या मुली आणि १५ वर्षांच्या मुलांचा विवाह कायदेशीर अशी माहिती आजतकच्या हवाल्यानुसार मिळत आहे.

मुलींच्या लग्नाचं वय
Open Marriage करणं योग्य की अयोग्य? कसा असतो विवाह? काय होतात परिणाम जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com