काँग्रेसने एकाचवेळी महाराष्ट्रासह ६ राज्याचे प्रभारी बदलले; राजकीय वर्तुळात खळबळ

Congress Reshuffles : काँग्रेस हायकमांडने संघटनात्मक फेरबदल केलेत. सहा राज्यांचे प्रभारी बदलले आहेत. सिरिवेल्ला प्रसाद यांच्याकडे महाराष्ट्राची, तर सचिन पायलट यांच्याकडे पंजाबची जबाबदारी देण्यात आली आहे.
Congress Reshuffles  :
Congress six state in-charge reshuffle 2026saam tv
Published On
Summary
  • काँग्रेस हायकमांडने सहा राज्यांमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल केला

  • डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या नव्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली

  • रमेश चेन्नीथला यांना महाराष्ट्राच्या प्रभारीपदावरून मुक्त करण्यात आले आहे.

काँग्रेस हायकमांडने धडाकेबाज निर्णय घेत महाराष्ट्रासह ६ राज्याचे प्रभारी बदलले आहेत. पक्षातील नेत्यांच्या नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेसकडून हे डॅमेड कंट्रोल करण्यात आल्याची चर्चा आहे. काँग्रेसनं महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांना हटवत त्यांच्या जागी आंध्र प्रदेशातील डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांची नियुक्ती केलीय. त्यांनी यापूर्वी झारखंड प्रभारी म्हणून जबाबदारी संभाळलीय. दुसरीकडे सचिन पायलट यांची पंजाब काँग्रेसचे नवे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. पायलट यांनी भूपेश बघेल यांची जागा घेतली आहे. राहुल गांधींच्या पंजाब दौऱ्यापूर्वी हा फेरबदल करण्यात आलाय.

Congress Reshuffles  :
Cabinet Reshuffle: मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेंनंतर दिल्लीतील हालचालींना वेग; पंतप्रधान मोदींनी मागवलं मंत्र्यांच्या कामगिरीचा रिपोर्ट

महाराष्ट्र आणि पंजाबमधील बदलाच्या फेरबदलांमुळे चर्चांना उधाण आलंय. भूपेश बघेल यांची आसामचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी आणि त्यांच्या गटाने बघेल यांच्या विरोधात मोहीम सुरू केली होती. अमरिंदर सिंग, राजा वारिंग यांची पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्याने चन्नी गट नाराज झाला होता. चन्नी गटाच्या नेत्यांच्या मते, राज्याचे प्रभारी असूनही, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री बघेल यांनी पंजाबमधील जमिनीवरील वास्तवाची माहिती काँग्रेस हायकमांडला दिली नाहीये.

Congress Reshuffles  :
सत्ताधारी पक्षातील नेत्याची भररस्त्यात हत्या; कार्यालयात जाताना सहा जणांच्या टोळीने घेरलं अन्...

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगली कामगिरी करायची असेल, तर वारिंग आणि बघेल यांच्या जागी एका खंबीर नेत्याला आणलं पाहिजं, असा चन्नी आणि त्यांच्या गटाने पक्ष श्रेष्ठींसमोर युक्तिवाद केला होता.अखेरीस हायकमांडला चन्नी गटापुढे नमते घेत प्रभारी बदलण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान भुपेश बघेल यांच्यानंतर, अमरिंदर सिंग यांचे पदही धोक्यात आले आहे. पंजाबमध्ये 2027 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

काँग्रेसचे प्रभारी भूपेश बघेल, राजा वारिंग, प्रताप सिंग बाजवा आणि इतर नेत्यांनी 3 सप्टेंबर रोजी दिल्लीत राहुल गांधींची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत पंजाबमधील सुरू असलेल्या गटबाजीवर चर्चा झाली. चन्नी गट भूपेश बघेल यांच्या विरोधात सातत्याने आंदोलन करत होता आणि पंजाबमधील रॅलींमध्ये "भूपेश बघेल परत जा" अशा घोषणा दिल्या जात होत्या. चन्नी गटाने भूपेश बघेल यांना हटवण्याची मागणी केली होती.

यानंतर 4 सप्टेंबर रोजी दिल्लीत एक संघटनात्मक बैठक झाली. या बैठकीत चन्नी गटाचे राणा गुरजीत देखील उपस्थित होते. या बैठकीदरम्यान त्यांनी के.सी. वेणुगोपाल यांचीही भेट घेतली. राणा गुरजीत यांनी सचिन पायलट यांचीही भेट घेतली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com