Congress : आचार्य प्रमोद कृष्णम यांची पक्षातून ६ वर्षांसाठी हकालपट्टी; पंतप्रधान मोदींची केली होती स्तुती

Acharya Pramod Krishnam : काँग्रेसने आचार्य प्रमोद कृष्णम यांची पक्षातून ६ वर्षांसाठी हकालपट्टी केलीय. अनुशासनहीनतेच्या तक्रारी आणि पक्षाविरोधात वारंवार वक्तव्य केल्यामुळे काँग्रेस पक्षाकडून ही कारवाई करण्यात आलीय.
Acharya Pramod Krishnam
Acharya Pramod Krishnam ANI
Published On

Congress Suspend Acharya Pramod Krishnam:

काँग्रेस पक्षाशी संबंधित मोठी बातमी समोर आलीय. काँग्रेसने आचार्य प्रमोद कृष्णम यांची पक्षातून ६ वर्षांसाठी हकालपट्टी केलीय. अनुशासनहीनतेच्या तक्रारी आणि पक्षाविरोधात वारंवार वक्तव्य केल्यामुळे काँग्रेस पक्षाकडून ही कारवाई करण्यात आलीय. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी कारवाईचं पत्र दिलं आहे.(Latest News)

अनुशासनहीनतेच्या तक्रारी आणि पक्षाविरुद्ध वारंवार विधाने केल्यामुळे आचार्य प्रमोद कृष्ण यांच्यावर निलंबनाची कारवाई कारवाई करावी, असा प्रस्ताव उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) काँग्रेस कमिटीने दिला होता,त्याला काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी तत्काळ मंजुरी दिली. मिळालेल्या माहितीनुसार,आचार्य प्रमोद कृष्णम यांनी काही दिवसापूर्वी पंतप्रधान मोदी आणि इतर कॅबिनेट मंत्र्यांची भेट घेतली होती.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याशिवाय त्यांनी पीएम मोदींचेही खूप कौतुक केले होते. काही दिवसांपासून ते आपल्याच पक्षाविरोधात वक्तव्य करत होते.कोणीही मंदिरात जाऊन हिंदू होत नाही आणि मशिदीत जाऊन कोणी मुस्लिम होत नाही. जो प्रभू रामाचा द्वेष करतो तो हिंदू असू शकत नसल्याचं त्यांनी एएनआयशी बोलताना म्हटले होते. राम मंदिराचे बांधकाम थांबवण्याचे प्रयत्न झाले, त्यामुळे सनातन धर्म मानणाऱ्या कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेला तडा गेला हे संपूर्ण जगाला माहीत असल्याचे ते म्हणाले होते.

Acharya Pramod Krishnam
Lok Sabha Election 2024 : इंडिया आघाडीला आणखी एक मोठा धक्का; 'आप'ची पंजाब आणि चंदीगडसाठी वेगळी रणनीती

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com