PM Modi in Loksabha
PM Modi in Loksabha ANI

Parliament Session 2024: भाजप सरकारची पाच वर्ष रिफॉर्म, परफॉर्म, आणि टॉन्सफॉर्मची; पंतप्रधान मोदींनी वाचला सरकारच्या कामांचा पाढा

PM Modi in Loksabha : मोदी सरकारच्या काळातील शेवटच्या संसदीय अधिवेशनात भाषण करताना पंतप्रधान मोदींनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे आभार मानले. भारतात आयोजित करण्यात आलेल्या जी२० च्या कार्यक्रमामुळे भारताचा इतर देशांवर प्रभाव पडला असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले.
Published on

Parliament Session PM Narendra Modi In Loksabha:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी १७ व्या लोकसभेच्या शेवटच्या बैठकीला संबोधित करताना त्यांच्या सरकारच्या गेल्या पाच वर्षातील कामगिरीवर प्रकाश टाकला. आपल्या भाषणात पीएम मोदींनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे आभार मानले. तसेच खासदारांचं अभिनंदन केलं. कोरोना काळात खासदारांनी वेतन त्यागल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांचं अभिनंदन केलं. या पाच वर्षाच्या कार्यकाळातील कामांचा आणि निर्णयांचा उल्लेख करत हे वर्ष रिफॉर्म, परफॉर्म, आणि टॉन्सफॉर्मची होती असं पंतप्रधान मोदी म्हणाले.(Latest News)

भाषण करताना पंतप्रधान मोदी परत एकदा भावूक झाले. जड आवाजात भाषण करताना मोदी म्हणाले, "रिफॉर्म आणि परफॉर्म हे दोन्ही करणं हे फार दुर्मिळ असतं आणि आपण आपल्या डोळ्यांसमोर परिवर्तन पाहू शकतो. १७ व्या लोकसभेच्या माध्यमातून देश हे अनुभवत आहे. मला ठाम विश्वास आहे की देश १७ व्या लोकसभेला दिलेल्या आशीर्वाद पुन्हा देईल.असं , पंतप्रधान मोदी म्हणाले.

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कोरोना व्हायरस या साथीच्या आजाराच्या काळात "कार्यक्षमतेने" सभागृह चालवल्याबद्दल प्रशंसा करत पंतप्रधान मोदी म्हणाले, याने संपूर्ण जगासाठी एक उदाहरण ठेवले. मी सर्व खासदारांचेही आभार मानतो, ज्यांनी कोविड-१९ चा सामना करण्यासाठी त्यांच्या पगारातील ३० टक्के निधी दिला. ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली ही १७ वी लोकसभा होती, ज्यांनी देशाला संसदेची नवीन इमारत दिली. १५ आणि १६ व्या लोकसभेत नवीन संसदेच्या इमारतीबाबत नेहमीच चर्चा होत होती. परंतु तुमच्या मार्गदर्शनाखाली देशाला संसदेची नवीन इमारत मिळाल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी जी२० च्या भारताच्या अध्यक्षपदाचा उल्लेख केला. या जी २० च्या कार्यक्रमामुळे जगभरातील देशांवर प्रभाव पाडला. "भारताला खूप सन्मान मिळाला आणि लोकशाहीची माता म्हणून भारत उदयास आल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. देशाची पुढील पीढीने आपली न्यायसंहिता पाहिली. सरकारने या कार्यकाळात दहशतवादाविरोधात कठोर कायदे केले. काश्मीरचा ३७० हटविला. तिहेरी तलाक कायदाने महिला शक्तीला मुक्ती देण्याचे काम १७ व्या लोकसभेने केले आहे.

पुढील २५ वर्षे देशासाठी महत्वाचे आहेत. राजकारण, महत्वाकांक्षा आपल्या जागी, परंतु देशाच्या अपेक्षा आकांक्षा या पूर्ण होत आहेत. हा देश इच्छित परिणाम पूर्ण करणार असल्याचं मोदी म्हणाले. महात्मा गांधींनी मीठाचा सत्याग्रह केला. खूप छोटी घटना वाटत होती. घोषणा दिली तेव्हा देशाच्या लोकांना एक शक्ती देऊन गेला. आज देश अशाच वाटेवर आहे, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. तरुणांसाठी ही पाच वर्षे खूप महत्वाची ठरल्याचं मोदी म्हणाले.

PM Modi in Loksabha
Amit Shah: रामाशिवाय देशाची कल्पना अशक्य.. लोकसभेत अमित शहांचे जोरदार भाषण; सभागृहात 'जय श्रीराम'च्या घोषणा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com