Lok Sabha Election 2024 : इंडिया आघाडीला आणखी एक मोठा धक्का; 'आप'ची पंजाब आणि चंदीगडसाठी वेगळी रणनीती

Arvind Kejriwal Latest News: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री भगवंत मान यांनी वेगवेगळ्या योजना आखायला सुरुवात केली आहे. यामुळे आप पंजाब आणि चंदीगडमध्ये स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal ANI
Published On

Arvind Kejriwal Latest News :

आगामी लोकसभा निवडणुकीआधी इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीआधी आम आदमी पक्षाचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठे घोषणा केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री भगवंत मान यांनी वेगवेगळ्या योजना आखायला सुरुवात केली आहे. यामुळे आम आदमी पक्ष पंजाब आणि चंदीगडमध्ये स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर येत आहे. (Latest Marathi News)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पंजाबच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातील एका कार्यक्रमाच्या सभेदरम्यान केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. 'आम आदमी पक्ष येत्या १५ दिवसांत पंजाबच्या १३ जागा आणि चंदीगडची १ जागा अशा एकूण १४ लोकसभा मतदारसंघावरील १४ उमेदवारांच्या नावांची घोषणा करेल, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

Arvind Kejriwal
Jalyukt Shivar Mission: एल नीनोवर कशी केली मात ? जलयुक्त शिवार अभियानावर होणाऱ्या आरोपांवरून देवेंद्र फडणवीस म्हणाले...

अरविंद केजरीवाल काय म्हणाले?

अरविंद केजरीवाल म्हणाले की, 'तुम्ही २ वर्षांपूर्वी खूप मोठा आशीर्वाद दिला आहे. पंजाबमध्ये विधानसभेच्या ११७ पैकी ९२ जिंकल्या. आज हात जोडून आणखी एक आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे. दोन महिन्यानंतर लोकसभा निवडणूक आहे. लोकसभा निवडणुकीसाठी पंजाबमध्ये १३ जागा आहेत. तर एक जागा चंदीगडमध्ये आहे. येत्या १५ दिवसांत आम आदमी पक्ष १४ जागांवर उमेदवारांची घोषणा करेल'.

Arvind Kejriwal
Obc Janmorcha : लोकसभा, विधानसभा निवडणुकीत ओबीसी जनमोर्चा मराठवड्यातील सर्व जागा लढवणार, नांदेडचा उमेदवारही ठरला?

'लोकांना विनंती आहे की, तुम्ही २ वर्षापूर्वी आशीर्वाद दिला होता. त्याचप्रकारे १४ लोकसभेच्या जागा आम आदमी पक्षाला जिंकायच्या आहेत. आपला बहुमताने १४ जागा जिंकायच्या आहेत. तुम्ही आमचे हात जितके मजबूत कराल, तितक्या जोरदार पद्धतीने आम्ही काम करू. आम्ही आयुष्यभर तुमची सेवा करू, असंही ते म्हणाले.

Arvind Kejriwal
PM Narendra Modi | रिफॉर्म,परफॉर्म,ट्रान्सफॉर्मची 5 वर्षे- पंतप्रधान नरेंद्र मोदी

दरम्यान, आपच्या निर्णयामुळे इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. इंडिया आघाडीच्या छताखाली पंजाबमधील जागा वाटपाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. इंडिया आघाडीला देशातील प्रत्येक राज्यात अडचणी येऊ लागल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधीच विरोधकांची आघाडीत बिघाडी आल्याचे दिसून येत आहे.

पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी, बिहारचे नितीश कुमार, उत्तर प्रदेशचे अखिलेश यादव यांनी त्यांच्या भूमिका बदलल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही जागांवर उमेदवारांचीही घोषणा केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com