

मध्य प्रदेशचे काँग्रेस आमदार भेरूसिंग बापू अपघातात जखमी
ते राजगड जिल्ह्यातील सुसनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
चौमहलाच्या दिशेने जात असताना त्यांच्या कारची स्कूटरला धडक बसली.
मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या आमदाराचा भीषण अपघात झालाय. या दुर्घटनेत आमदार भेरूसिंग बापू हे जखमी झालेत. भेरूसिंग बापू हे मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील सुसनेर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. प्राथमिक माहितीनुसार, आमदार कारने चौमहलाच्या दिशेने जात असताना हा अपघात घडलाय. आमदाराच्या कारसमोर अचानक स्कुटर आल्यानं दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. या अपघातात आमदार भेरूसिंग यांना अनेक दुखापती झाल्या असून त्यांच्या मानेलाही दुखापत झाली.
सध्या त्यांना उपचारांसाठी राजस्थानमधील चौमहला येथील रुग्णालयात नेण्यात आलंय. गुरुवारी संध्याकाळी राजस्थानमधील चौमहला येथील निपानिया फाटा येथे हा अपघात झालाय. या अपघातात कारमध्ये असलेले मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील सुसनेर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार भेरूसिंग परिहार आणि स्कूटरवर असलेला लालसिंग नावाचा व्यक्ती जखमी झालेत. या घटनेमुळे घटनास्थळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. अपघातानंतर, तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी दोन्ही जखमींना चौमहला सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार भेरूसिंग परिहार आपल्या वैयक्तिक कारने चौमहला येथून कुंडालाच्या दिशेने जात होते. निपानिया झाला जंक्शनजवळ त्यांची कार एका इलेक्ट्रिक स्कूटरला धडकली. या अपघातात दोन्ही वाहनांमधील व्यक्ती जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तातडीने मदत करत दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चौमहला आरोग्य केंद्रात धाव घेत पंचनामा केलाय. आमदाराच्या अपघाताची बातमी समजताच त्यांच्या समर्थकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. त्यावेळी परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला.
चौमहला सामुदायिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर आमदार भेरूसिंग परिहार यांना डॉक्टरांनी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पाठवलंय. दरम्यान, या अपघातात दुचाकीस्वारही जखमी झाला असून त्याचे नाव लाल सिंग आहे. २६ वर्षीय लाल सिंग हे रुंडी गावचा रहिवासी आहेत. त्यांच्यावर चौमहला रुग्णालयात उपचार सुरू आहेत; त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.