Sonia Gandhi : राजकारणातून निवृत्त होण्याच्या चर्चांवर सोनिया गांधी यांचं मोठं विधान; म्हणाल्या, 'मी कधीच...'

राजकारणातून निवृत्त होण्याच्या चर्चांवर सोनिया गांधी यांनी मोठं विधान केलं आहे.
sonia gandhi
sonia gandhi Saam Tv

नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या कालच्या रायपूरमधील काँग्रेसच्या ८५ व्या अधिवेशनात केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. राजकारणातून निवृत्त होण्याच्या चर्चांवर सोनिया गांधी यांनी मोठं विधान केलं आहे. सोनिया गांधी यांनी राजकारणातून निृवत्ती घेण्याचं वृत्त फेटाळले आहे. काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी ही माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

अलका लांबा यांनी सांगितले की, 'सोनिया गांधी यांच्यासोबत राजकारणातील निवृत्तीच्या चर्चेवर संवाद झाला. अलका म्हणाल्या की, 'प्रसार माध्यमातील राजकारणातील वृत्ताविषयी सांगितलं. तेव्हा हसत हसत म्हणाल्या की, 'मी कधीच राजकारणातून निवृत्त झाली नाही. पुढेही मी कधीच राजकारणातून निवृत्त होणार नाही'.

लोकसभा निवडणूक लढवणार नाही : सोनिया गांधी

कालच्या रायपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान सोनिया गांधी (Congress) म्हणाल्या होत्या की, ' लोकसभा निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा केली आहे. सोनिया गांधींची या घोषणेमुळे त्या राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत देत आहेत अशी चर्चा सुरू झाली होती.

sonia gandhi
Abhijeet Bichukale : 'माझ्याकडे पैसे नाहीत त्यामुळे...' नेमकं असं का म्हणाले अभिजीत बिचुकले?

सोनिया गांधी यांनी रायपूरच्या काँग्रेस (Congress) अधिवेशनात भाजपवर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या होत्या की, सरकार घटनात्मक मूल्ये चिरडत असून संवैधानिक संस्था आरएसएस-भाजपच्या ताब्यात आहेत. आजचा काळ देश आणि काँग्रेससाठी आव्हानात्मक आहे. दलित, अल्पसंख्याक, महिलांवर अत्याचार होत असून सरकार काही उद्योगपतींना पाठबळ देत आहे'.

sonia gandhi
Sanjay Raut : 'स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी केल्यावर....'; संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघात

यावेळी सोनिया यांनी भारत जोडो यात्रेचा संदर्भ देत काँग्रेसशी जनतेचा संबंध जिवंत झाल्याचे सांगितले. सोनिया गांधी म्हणाल्या, काँग्रेसने लोकशाही मजबूत केली. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली आपण चांगले सरकार दिले असे म्हणत सोनिया गांधी यांनी मनमोहन सिंह यांच्या कार्याचे कौतुक केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com