Sonia Gandhi On BJP : सत्तेचा दुरुपयोग करणारे खरे राष्ट्रविरोधी; सोनिया गांधींचा हल्लाबोल

Sonia Gandhi On Modi Government : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला.
Sonia Gandhi On Modi Government
Sonia Gandhi On Modi GovernmentSAAM Tv
Published On

Sonia Gandhi Statement : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला. स्वायत्त संस्थांचं अस्तित्व नष्ट केल्याचा आरोपही सोनियांनी केला.

सरकार सत्तेचा दुरुपयोग करत आहे. संविधान वाचवण्यासाठी आता लोकांनी पुढे यायला हवे, असंही सोनिया गांधी म्हणाल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त द टेलिग्राफमध्ये लिहिलेल्या लेखाद्वारे सोनिया यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. (Latest News Update)

Sonia Gandhi On Modi Government
BJP-Congress Alliance : एकमेकांचे कट्टर विरोधक काँग्रेस-भाजप 'या' जिल्ह्यात एकत्र; राजकीय वर्तुळात चर्चाच चर्चा

सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडताना विविध मुद्द्यांकडे लक्ष वेधले. जे धर्म, जाती, लिंग आणि भाषेच्या मुद्द्यावर एकमेकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, तेच खरे राष्ट्रविरोधी आहेत, अशा शब्दांत सोनियांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला. लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणारे लोक आपल्याकडील ताकदीचा गैरवापर करत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

'घटनात्मक संस्था नष्ट करण्याचा प्रयत्न'

सोनिया गांधी म्हणाल्या की, 'सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. अनेक संवैधानिक संस्था नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्याचे सरकार स्वतंत्रता, समानता, न्याय आणि बंधुत्व यांसारख्या मूलतत्वांना कमकुवत करत आहे.'

Sonia Gandhi On Modi Government
Chandrashekhar Bawankule on Rahul Gandhi: 'माफी मागा, मग महाराष्ट्रात पाय ठेवा', चंद्रशेखर बावनकुळेंचा राहुल गांधींना इशारा

यावेळी सोनिया गांधींनी लोकशाही वाचवण्याचे आवाहन नागरिकांना केले. लोकांनी पूर्वनियोजित पद्धतीने होत असलेल्या हल्ल्यांपासून संविधान वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेही त्या म्हणाल्या.

लोकांना त्रास देण्यासाठीच सत्तेचा चुकीचा वापर केला जात आहे. काही निवडक मित्रांच्या हितासाठी काम करत असल्याने देशातील बहुतांश नागरिकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे, असा आरोपही त्यांनी लेखाद्वारे केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com