Mallikarjun Kharge: 'राज्यघटनेचे पालन करा,न घाबरता देशसेवा करा'; खरगेंचं सरकारी अधिकाऱ्यांना आवाहन

Kharge Wrote letter To Bureaucrats : लोकसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर केले जाणार आहेत. या निकाल जाहीर करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कुठल्याच दबावाला बळी न पडता आपले कर्तव्य पार पाडावे, असं आवाहन खरगे यांनी केलंय.
Kharge  Wrote letter To Bureaucrats
Kharge Wrote letter To Bureaucrats

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पूर्वसंध्येला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नागरी सेवक आणि सरकारी अधिकाऱ्यांना संविधानाचे पालन करावे, त्यांची कर्तव्ये पार पाडावीत आणि भीती, पक्षपाताशिवाय वागावे" कोणाविषयी द्वेष ठेवता देशाची सेवा, असं आवाहन केलं आहे. खरगे यांनी सरकारी अधिकाऱ्यांना एक खुले पत्र लिहित हे आवाहन केलंय.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नोकरशहांना पत्र लिहितांना सत्ताधारी सरकारवर काही गंभीर आरोप केलेत. सत्ताधाऱ्यांना स्वायत्त संस्थांना दडपण्याचा आणि त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला, यामुळे लोकशाही संकटात आल्याचा आरोपही खरगे यांनी केलाय.

खरगे आपल्या पत्रात म्हणाले की, विरोधी पक्षनेता (राज्यसभा) आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने मी तुम्हाला पत्र लिहित आहे. १८ व्या लोकसभेच्या निवडणुका पूर्ण झाल्या असून उद्या, ४ जून २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे. 'मी भारतीय निवडणूक आयोग, केंद्रीय सशस्त्र दल, विविध राज्यांचे पोलीस, नागरी सेवक, जिल्हाधिकारी, स्वयंसेवक आणि तुमच्यापैकी प्रत्येकाचे अभिनंदन करू इच्छितो, जे याच्या अंमलबजावणीत सहभागी आहेत. हे मोठे आणि ऐतिहासिक कार्य होते.

आमचे प्रेरणास्थान आणि भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी नागरी सेवकांना “स्टील फ्रेम ऑफ इंडिया” असं म्हटलंय. भारतीय जनतेला हे चांगले माहीत आहे की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनेच भारतीय संविधानाच्या आधारे अनेक संस्था स्थापन केल्या, त्यांचा भक्कम पाया घातला आणि त्यांच्या स्वातंत्र्यासाठी यंत्रणा तयार केली.

संस्थांचे स्वातंत्र्य सर्वोपरी आहे, कारण प्रत्येक नागरी सेवकाने राज्यघटनेला शपथ दिली आहे की तो “आपली कर्तव्ये निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडेल आणि सर्व वर्गातील व्यक्तींना न घाबरता किंवा पक्षपातीपणा, आपुलकीने किंवा द्वेषविना, संविधान आणि कायद्यानुसार वागेल. या भावनेने, पदानुक्रमाच्या वरपासून खालपर्यंत प्रत्येक नोकरशहा आणि अधिकाऱ्याने राज्यघटनेच्या भावनेनुसार, सत्ताधारी पक्ष/युतीचा कोणताही दबाव, धमकी किंवा प्रभाव न घेता आपली कर्तव्ये पार पाडावीत अशी आमची अपेक्षा असल्याचं काँग्रेस अध्यक्षांनी पत्रात म्हटलंय.

खरगे आपल्या पत्रात म्हणाले की, सत्ताधारी पक्षाकडून आपल्या स्वायत्त संस्थांवर हल्ला करण्याचा, त्यांना कमकुवत करण्याचा आणि दडपण्याचा पद्धतशीर प्रकार केला गेला आहे. त्यामुळे भारताच्या लोकशाही मूल्यांना हानी पोहोचत आहे. भारताला हुकूमशाही राजवटीत बदलण्याची व्यापक प्रवृत्ती असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com