Election Commission : मतदान प्रक्रियेवरच हल्ला; काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या आरोपांना केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पत्रातून उत्तर

Election Commission on mallikarjun kharge allegation :काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मतदानात तफावत असल्याचं म्हणत केंद्रीय निवडणूक आयोगावर आरोप केला होता. खरगे यांचे मतदानाबाबतचे आरोप फेटाळत केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रातून उत्तर दिलं आहे.
Election Commission : तुमच्याकडून निवडणुकीच्या प्रक्रियेवर हल्ला करण्याचा प्रयत्न; निवडणूक आयोगाकडून काँग्रेस अध्यक्षांना उत्तर
Election Commission Saam tv

नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मतदानात तफावत असल्याचं म्हणत केंद्रीय निवडणूक आयोगावर आरोप केला होता. खरगे यांचे मतदानाबाबतचे आरोप फेटाळत केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रातून उत्तर दिलं आहे. या पत्रातून काँग्रेस अध्यक्ष खरगे यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. 'लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे, असं म्हणत केंद्रीय निवडणूक आयोगाने काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या आरोपांना उत्तर दिलं आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मतदारांच्या संख्येवर उपस्थित केलेल्या पश्नांना उत्तर दिले आहे. अद्ययावत डेटा हा मतदान झाल्यानंतर जाहीर केला जातो. २०१९ साली याच प्रकारे जाहीर केला होता. तुम्ही असे आरोप करून लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे, असे आयोगाने म्हटलं आहे.

Election Commission : तुमच्याकडून निवडणुकीच्या प्रक्रियेवर हल्ला करण्याचा प्रयत्न; निवडणूक आयोगाकडून काँग्रेस अध्यक्षांना उत्तर
EAC-PM Report : लोकसभा निवडणुकीदरम्यान लोकसंख्येच्या अहवालावरून राजकारण तापलं; रिपोर्टमध्ये नेमकं आहे तरी काय?

लोकसभा निवडणुकीच्या मध्यावर या प्रकारचे आरोप करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण होतो. तसेच निष्पक्ष निवडणुकांच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण होतात, असेही आयोगाने म्हटलं आहे.

Election Commission : तुमच्याकडून निवडणुकीच्या प्रक्रियेवर हल्ला करण्याचा प्रयत्न; निवडणूक आयोगाकडून काँग्रेस अध्यक्षांना उत्तर
Nitin Gadkari : ...तर रगडल्याशिवाय राहणार नाही; नितीन गडकरींनी बीडच्या सभेत कोणाला भरला दम?

निवडणूक आयोगाने काँग्रेस अध्यक्ष खरगे यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. विश्लेषण केल्यानंतर मतदानाची टक्केवारी अधिक येते. २०१९ साली देखील याच प्रकारे टक्केवारी जाहीर केली होती. काँग्रेस अध्यक्ष आरोप करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे. एकांगी बाजूने आरोप करण्याचा प्रयत्न करत आहे, असेही आयोगाने म्हणते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com