
सध्या भारत पाकिस्तानमधील परिस्थिती खूप तणावाची आहे. भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर केले. याच हल्ल्याची माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी मीडियासमोर दिली. भारताची नारीशक्ती त्यांनी दाखवून दिली. सोफिया कुरेशी भारतीय सैन्यात कर्नल पदावर कार्यरत आहेत. त्यांच्यासोबतच विंग कमांडर व्योमिका सिंगदेखील होत्या. सोफिया कुरेशी यांना लहानपणापासून घरातूनच सैन्यात भरती होण्याचे बाळकडू मिळाले होते.
सोफिया कुरेशी यांच्या कुटुंबातील अनेकजण भारतीय सैन्यात कार्यरत होते. त्यांचे वडील आणि आजोबा लष्करात कार्यरत होते. सोफिया यांना शास्त्रज्ञ व्हायचे होते. परंतु बहिणीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी लष्करात जाण्याचा निर्णय घेतला. सोफिया या सध्या खूप चर्चेत आल्या आहेत. सोफिया यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोफिया यांनी २०१७ मध्ये एका मुलाखतीत त्यांच्या प्रवासाबद्दल, कुटुंबाबद्दल माहिती दिली होती. त्यांनी सांगितले की, 'माझी पंजी आजी या १८५७ च्या लढ्यात राणी लक्ष्मीबाई यांच्यासोबत होत्या. त्या म्हणाल्या की, 'मी फौजीची मुलगी आहे. आमच्या घरात नेहमीच लष्कराचे वातावरण होते. माझी Great Grandmother राणी लक्ष्मीबाईंसोबत स्वातंत्र्य लढ्यात होत्या.माझे आजोबादेखील भारतीय सैन्यात कार्यरत होत. ते नेहमी म्हणायचे, नेहमी अलर्ट राहणे हे कर्तव्य आहे आणि आपल्या देशासाठी उभं राहणे हे आपले कर्तव्य आहे'.
सोफिया कुरेशी यांना घरातूनच आर्मीबाबत सकारात्मक दृष्टीकोन मिळाला. त्यांच्या बहिणीलादेखील आर्मीत भरती व्हायचे होते. परंतु त्यांना शक्य झाले आहे. त्यांची बहिण शायना सनसुरा यांनी सांगितले की, आम्ही फौजीच्या मुली आहोत. त्या काळी मुली आर्मीत जॉइन होत नव्हत्या. परंतु आम्हाला दोघांनाही आर्मीत जॉइन व्हायचे होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.