ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतीय सैन्यात जाण्याचे अनेकांचे स्वप्न असते. सैन्यात अनेक पदांवर तुम्हाला काम करायची संधी मिळते.
सैन्यात भरती होण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एनडीए किंवा सीडीएस परीक्षा उत्तीर्ण करावी लागते.
ही परीक्षा झाल्यानंतर सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड तुमची मुलाखत घेते. त्यात शारीरिक आणि मानसिक तपासणी होते.
यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना भारतीय संरक्षण अकॅडमी म्हणजे एनडीएमध्ये प्रशिक्षण दिले जाते.
यानंतर भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून काम करणे आवश्यक आहे.
१५ वर्षांची सेवा केल्यानंतर तुम्ही कर्नल पदासाठी पात्र होता.
१५ वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी सिलेक्शन प्रोसेस पार पडते.
या सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुम्ही पास झाल्यावर तुम्हाला पदोन्नती मिळते. यासाठी काही निकष आहेत. त्यात तुम्ही बसणे आवश्यक आहे.
सदर माहिती गुगलवर उपलब्ध आहे.