ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारताने पाकिस्तानवर काल रात्री ऑपरेशन सिंदूर राबवले. ऑपरेशन सिंदूर कसं राबवण्यात आले, याबाबत दोन महिला अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत हवाई हल्ल्याबाबत माहिती दिली आहे.
सोफिया कुरेशी या लष्करात कर्नल पदावर कार्यरत आहेत.
सोफिया यांनी बहुराष्ट्रीय सरावात लष्कराच्या अनेक तुकड्यांचे नेतृत्व केले आहे.
कर्नल सोफिया कुरेशी या मूळच्या गुजरातच्या आहे.
सोफिया यांचा जन्म १९८१ मध्ये वडोदरात झाला.
सोफिया यांची १९९९ मध्ये भारतीय लष्करात निवड झाली.
चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये सोफिया यांचे प्रशिक्षण झाले आहे.
सोफिया यांचे आजोबा आणि वडीलदेखील भारतीय सैन्यात कार्यरत होते.
Next: उरी ते फायटर, हवाई हल्ल्यावर आधारित टॉप १० चित्रपट