सावधान, हिमालय विरघळतोय! कोट्यवधी लोकांचा जीव धोक्यात, शास्त्रज्ञांचा इशारा

Climate Warning Himalayas Melting : 120 वर्षांच्या तापमानाच्या नोंदींच्या अभ्यासातून हिमालयातील वाढत्या तापमानाबाबत गंभीर इशारा देण्यात आला आहे. हिमनद्या आणि जलस्रोतांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
Climate Warning Himalayas Melting
HIMALAYAS ARE MELTING: SCIENTISTS WARN OF SERIOUS RISKS TO BILLIONSsaam tv
Published On
Summary
  • हिमालयातील वाढत्या तापमानाबाबत गंभीर चिंता व्यक्त

  • तापमानवाढीमुळे हिमालयीन हिमनद्या आणि बर्फाच्छादित प्रदेशांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता

  • हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्यांवर अवलंबून असलेल्या कोट्यवधी लोकांच्या पाणी सुरक्षेवर परिणाम

सावधान,हिमालय विरघळतोय! हो, तुम्ही ऐकताये ते खरं आहे. हिमालयाच्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांसाठी चिंतेची बातमी आहे. 120 वर्षांच्या तापमानाच्या माहितीचा अभ्यास करुन शास्त्रज्ञांनी गंभीर इशारा दिलाय. भविष्यात हिमालयावर नक्की काय बदल होणार आहे ? दीड अब्ज लोकांचं जीवन कसं धोक्यात आलंय? पाहूया एक रिपोर्ट.

Climate Warning Himalayas Melting
अपार्टमेंटमध्ये घर घेताय? कोणत्या मजल्यावर फ्लॅट घेणं असतं शुभ? घर खरेदीवेळी चार गोष्टी ठेवा डोक्यात

हवामान बदलाचे परिणाम आता भारतीय हिमालयीन प्रदेशात विविध प्रकारे दिसून येत आहेत. 'जर्नल ऑफ अर्थ सिस्टीम सायन्स'मध्ये प्रकाशित झालेल्या एका ताज्या संशोधन अभ्यासात ही चिंताजनक वस्तुस्थिती समोर आली आहे. पश्चिम हिमालय ज्यात लडाख, जम्मू आणि काश्मीर, आणि हिमाचल प्रदेश यांचा समावेश आहे.

Climate Warning Himalayas Melting
Maharashtra Weather : बंगालच्या उपसागरात 'डिप्रेशन'; महाराष्ट्रात हवामान बदलणार, पाहा तुमच्या जिल्ह्यात कसा राहील पाऊस...

जागतिक कार्बन उत्सर्जनात मोठ्या प्रमाणात कपात केली नाही, तर या शतकाच्या अखेरीस पश्चिम हिमालयीन प्रदेशातील मोसमी बर्फाचा एक महत्त्वपूर्ण भाग नाहीसा होऊ शकतो. बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (बीआयटी) मेसरा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑरॉलॉजी (आयआयटीएम) पुणे आणि अशोका विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी संयुक्तपणे या विषयावर अभ्यास केला आहे.

संशोधकांनी 1901 ते 2020 या 120 वर्षांच्या प्रत्यक्ष तापमानाच्या माहितीचे विश्लेषण केले. आणि आठ जागतिक हवामान मॉडेल्सच्या आधारे 2100 सालासाठी संभाव्य परिस्थितीचा अंदाज लावला. संपूर्ण भारतीय हिमालयीन प्रदेशाची पश्चिम, मध्य (ज्यामध्ये उत्तराखंड) आणि पूर्व (ज्यामध्ये सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि ईशान्य) या तीन विभागांमध्ये विभागणी करण्यात आली.

अभ्यासातून समोर आलेली गंभीर गोष्ट म्हणजे रात्रीच्या तापमानात जलद वाढ होत आहे. उत्सर्जन वाढल्यास, हिवाळ्यातील तापमान 7 अंशांपर्यंत वाढू शकते. हिमनद्यांना महापूर येऊ शकतो. अंदाजे दीडशे कोटी लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. या शतकाच्या अखेरीस, उच्च-उत्सर्जन परिस्थितीत, वसंत ऋतूतील बर्फवृष्टी ९५.९ किलोग्रॅम प्रति चौरस मीटरपर्यंत पोहोचू शकते.

ज्यामुळे अनेक भागांमध्ये मोसमी बर्फ जवळजवळ नाहीसा होईल. पूर्व हिमालयात तापमानवाढीचा दर पश्चिम भागापेक्षा कमी असला तरी, हा प्रदेश अजूनही सुरक्षित नाही. संशोधकांच्या मते, पूर्व हिमालयीन प्रदेश पुरांसाठी एक हॉटस्पॉट बनत आहे. त्यामुळे वेळीच ग्लोबल वॉर्मिंग रोखलं नाही तर हाच हिमालय कोट्यवधींच्या जीवावर उठल्याशिवाय राहणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com