Sudan Abyei Clash: सुदानमध्ये अंदाधुंद गोळीबार, ५२ जणांचा जागीच मृत्यू; ६४ हून अधिक जखमी

Sudan News Today: बंदूकधाऱ्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ५२ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ६४ हून अधिक लोक जखमी झाले.
Sudan Abyei Clash
Sudan Abyei ClashSaam TV
Published On

Sudan Abyei Clash Latest News

सुदानमधून एक भयानक घटना समोर आली आहे. अबेई येथे बंदूकधारी आणि गावकऱ्यांमध्ये रविवारी (२८ जानेवारी) हिंसक चकमक झाली. यावेळी बंदूकधाऱ्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ५२ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ६४ हून अधिक लोक जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sudan Abyei Clash
Breaking News: देवीचं जागरण सुरू असताना मंदिरातील स्टेज कोसळला; महिलेचा जागीच मृत्यू, थरारक घटनेचा VIDEO समोर

मृतांमध्ये संयुक्त राष्ट्राच्या शांती सैनिकाचाही समावेश असल्याची माहिती आहे. एपी या वृत्तसंस्थेने एका प्रादेशिक अधिकाऱ्याच्या हवाल्याने या घटनेची माहिती दिली आहे. अबेईचे माहिती मंत्री बुलिस कोच यांनी या घटनेबाबत सांगितले की, अबेई येथील गावकरी आणि बंदूकधाऱ्यांमध्ये रविवारी चकमक झाली. (Latest Marathi News)

यावेळी बंदुकधाऱ्यांनी अंदाधूंद गोळीबार केला. यात महिला, लहान मुलांसह अनेकांचा जागीच मृत्यू झाला. नेमकी ही घटना कोणत्या कारणामुळे घडली, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, जमिनीच्या वादातून हा हल्ला झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

कोच पुढे म्हणाले की, या हिंसाचारात सहभागी हल्लेखोर नुएर जमातीचे होते. ते मोठ्या प्रमाणावर शस्त्रसज्ज होते. या सशस्त्र तरुणांनी गेल्या वर्षी पुरामुळे त्यांच्या भागातून वराप राज्यात स्थलांतर केले होते. तेथून परतल्यानंतर जमिनीच्या वादातून गावकरी आणि त्यांच्या वाद सुरू झाला होता.

सुदानमध्ये दररोज वांशिक हिंसाचार होत असतो. शेजारच्या वॅरॅप राज्यातील ट्विक डिंका हे आदिवासी सीमेवरील अनित भागावर अबेईच्या एनगोक डिंका यांच्याशी जमिनीच्या वादात अडकले आहेत. सुदान आणि दक्षिण सुदान दोघेही अबेईच्या मालकीचा दावा करतात. २०११ मध्ये दक्षिण सुदान सुदानपासून स्वतंत्र झाल्यानंतर या स्थितीचे निराकरण झाले नाही.

एका निवेदनात, संयुक्त राष्ट्र अंतरिम सुरक्षा दल (UNISFA) मधील अबेईने (UNISFA) शांतता सैनिकाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या हिंसाचाराचा निषेध केला असून याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देखील दिला आहे. या घटनेनं संपूर्ण जगभरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Sudan Abyei Clash
Rashi Bhavishya In Marathi: या राशीच्या लोकांच्या व्यवसायात वाढ होईल, जाणून घ्या तुमचे भविष्य

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com