

कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठी फूट पडल्याचा दावा.
मनीष ब्रह्मभट्ट यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी डेमोक्रेटिक’ या नव्या पक्षाची घोषणा केली.
ब्रह्मभट्ट यांनी जुन्या पक्षावर गंभीर आरोप केले आहेत.
सुप्रीम कोर्टाने आंदोलकांवरील सर्व गु्न्हे रद्द केल्यानं कॉक्रोच जनता पक्षाचा मोठा विजय झाला असताना सीजेपी संदर्भात एक मोठी बातमी हाती आलीय. नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलन करत केंद्र सरकारला बॅकफूटवर आणणाऱ्या सीजेपी म्हणजे कॉक्रोच जनता पक्षात मोठी फूट पडलीय. सीजेपीमधील कार्यकर्ते मनीष ब्रह्मभट्ट यांनी पार्टीवर गंभीर आरोप करत नव्या पक्षाची स्थापना केलीय.
कॉक्रोच जनता पार्टी' ही आता पूर्णपणे अरविंद केजरीवाल यांची पार्टी बनलीय, असा गंभीर आरोप करत दिल्ली आंदोलनाशी जोडलेल्या काही कार्यकर्त्यांनी वेगळी चूल मांडलीय. मनीष ब्रह्मभट्ट या युवकाने गुरुवारी 'कॉक्रोच जनता पार्टी डेमोक्रेटिक' स्थापनेची अधिकृत घोषणा केलीय.
मनीष ब्रह्मभट्ट हे अहमदाबादचे रहिवासी आहेत. त्यांनी सीजेपीच्या दिल्लीच्या जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता त्यांनी पक्षावर गंभीर आरोप करत नवीन पक्षाची स्थापना केलीय. सीजेपी आंदोलनानंतर सर्व काही विकले गेलंय. ही केवळ 'टीम केजरीवाल' बनून राहिली, असा दावा ब्रह्मभट्ट यांनी केलाय. पक्षासह ब्रह्मभट्ट यांनी दिपके यांच्यावरही गंभीर आरोप केलाय. दीपकेंनी आपल्या टीममध्ये मित्र आणि मैत्रिणींचा भरणा केल्याचा आरोप त्यांनी केलाय.
अभिजीत दीपके यांच्यावर थेट निशाणा साधत ब्रह्मभट्ट म्हणाले, "अभिजीत दीपकेंनी घर बसून 12 लोकांची टीम तयार केली. यासाठी कोणत्याही मूळ कार्यकर्त्याला किंवा आंदोलनाशी जोडलेल्या लोकांना बोलवलं नाही. या पदांसाठी काय निकष लावले गेले? त्यांनी आम आदमी पार्टीशी (AAP) जोडलेल्या आठ लोकांना, स्वतःच्या मैत्रिणींना आणि कॉलेजच्या मित्रांना यात का घेतले. आम्हाला प्रत्येक राज्यातून 5 प्रतिनिधी हवे होते. ज्यामुळे कोणीही हुकूमशहा किंवा 'राजा' बनून निर्णय घेणार नाही. परंतु ही मागणी फेटाळून लावत मनमानी कारभार सुरू करण्यात आल्याचा आरोपही मनीष ब्रह्मभट्ट यांनी केलाय.
ब्रह्मभट्ट यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. "ही टीम बनवण्याची मूळ कल्पना अरविंद केजरीवाल यांचीच होती. ते सुरुवातीपासूनच फसवणूक करत आलेत. जेव्हा अन्ना हजारे यांचे आंदोलन सुरू झाले, तेव्हा त्यांनी अण्णा हजारे यांचा वापर करून स्वतःचा राजकीय फायदा करून घेतला.
"केजरीवाल यांनी पक्ष स्थापन करताना जनता सांगेल त्याला तिकीट देऊ आणि स्वराज आणू, असा दावा केला होता. पण सत्ता आल्यावर त्यांनी स्वराज कायदा बाजूला सारला. आता सीजेपीचे आंदोलन यशस्वी झाल्यावर केजरीवाल यांनी अभिजीत दीपके यांच्यासोबत डील करून हे आंदोलन हायजॅक केलंय. सीजेपीमध्ये कार्यकर्ते समाविष्ट करण्यासाठीच सर्व तडजोडी करण्यात आल्याचा आरोपीही ब्रह्मभट्ट यांनी केला. सीजेपीच्या नव्या कार्यकारिणीत एकाही मुस्लिम पुरुषाला किंवा शिख प्रतिनिधीला स्थान देण्यात आले नाही, असेही ब्रह्मभट्ट म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.