विद्यार्थी अंधारात, वर्गात धान्याचा साठा! जि.प. शाळांची दुरवस्था पाहून दिपकेंचा दादा भुसेंना थेट इशारा

Abhijeet Dipke School Theek Karo campaign : अभिजीत दीपके यांनी हिंगोलीतील जि.प. शाळांची पाहणी केली. यावेळी शाळांची अवस्था पाहून त्यांना दीपकेंचा संताप अनावर झाला. अभिजीत दीपके यांनी दादा भुसेंविरोधात आंदोलन करू असा इशारा दिलाय.
Abhijeet Dipke School Theek Karo campaign
Abhijit Dipke School Theek Karo campaign Hingolisaam tv
Published On
Summary
  • हिंगोलीतील जि.प. शाळांच्या दुरवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय.

  • जामदया शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक अंधारात शिक्षण घेत असल्याचा दावा करण्यात आला.

  • शिकवण्याच्या वर्गातच धान्य साठवून ठेवल्याची बाब पाहणीदरम्यान समोर आल्याचे सांगण्यात आले.

संदीप नागरे,साम प्रतिनिधी

कॉक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याविरोधात आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. पुढील पंधरा दिवस शाळा पाहणी केल्यानंतर सविस्तर अहवाल तयार करून राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना देखील या आंदोलनात सहभागी करत आंदोलन करणार असल्याचं दिपके यांनी सांगितले आहे.

Abhijeet Dipke School Theek Karo campaign
जंतर-मंतरच्या आंदोलनासाठी फंडिंग कशी आली? अभिजीत दीपकेंनी 'साम टीव्हीशी बोलताना सर्वच सांगितलं|VIDEO

अभिजीत दीपके स्कूल ठीक करो अभियानांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील शाळेच्या पाहणीसाठी आले होते. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरावस्था पाहून त्यांनी थेट शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना इशारा दिलाय. स्कूल ठीक करो अभियानासाठी अभिजीत दिपके आज हिंगोली जिल्ह्यात तिसऱ्यांदा शाळा पाहण्यासाठी दाखल झाले होते. यावेळी त्यांनी सेनगाव तालुक्यातील लोहगाव ,करंजाळा, जामदया गावातील जिल्हा परिषद शाळांची पाहणी केली. . तर शाळेत शिकवण्याच्या वर्गात धान्य साठवून ठेवण्यात आल्याची बाब समोर आलीय.

Abhijeet Dipke School Theek Karo campaign
Abhijeet Dipke Announcement: अभिजीत दीपके राजकारणात येणार? निवडणुकीसंदर्भात केली मोठी घोषणा

यावेळी जामदया गावात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक अंधार कोठडीमध्ये शिक्षण घेत असल्याचे पुढे आले आहेत अभिजीत दिपकेंनी हिंगोली सेनगाव व औंढा तालुक्यातील शाळांची पाहणी केल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यादरम्यान अनेक शाळेत शौचालयाची स्थिती ठीक नसल्याने दिपकेंनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिलाय.

दरम्यान याआधी अभिजीत दीपके यांनी १८ ऑगस्ट रोजी हिंगोली तालुक्यातील लिंबाळा (मक्ता) येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासह विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारच्या शैक्षणिक धोरणावर जोरदार टीका केली होती. सरकारी शाळांची सध्या दयनीय अवस्था झालीय.

शिक्षकांची रिक्त पदे, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वर्गखोल्यांची दुरवस्था अशा अनेक समस्यांनी या शाळा ग्रासल्या आहेत. मात्र, सरकारी यंत्रणेकडून त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांची मुले खासगी शाळांमध्ये शिकत आहेत, त्यामुळे सरकारी शाळा सुरू राहिल्या किंवा बंद पडल्या, तरी त्यांना काही देणे-घेणे नसल्याचा आरोप दीपके यांनी त्यावेळी केला होता. आता सेनगाव तालुक्यातील लोहगाव, करंजाळा, जामदया गावातील जिल्हा परिषद शाळांची पाहणी केली. शाळांची दुरावस्था पाहून दीपके संतापले. यावेळी त्यांनी थेट शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसेंच्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com