निवडणूक आयोगाच्या कारभारावर आणि एसआयआर प्रक्रियेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना इशारा दिला आहे. ज्ञानेश कुमार यांनी शनिवारपर्यंत राजीनामा न दिल्यास 2 ऑक्टोबरपासून मुंबईतून देशव्यापी आंदोलनाला सुरुवात करण्याची घोषणा दीपके यांनी केली आहे.
अभिजीत दीपके यांनी शुक्रवारी, 25 सप्टेंबर रोजी 'एक्स'वर पोस्ट करत ही माहिती दिली. ज्ञानेश कुमार यांनी उद्यापर्यंत राजीनामा दिला नाही, तर सीजेपी 2 ऑक्टोबर रोजी मुंबईतून देशव्यापी विरोध प्रदर्शन सुरू करेल. हे आंदोलन देशभरातील शहरांमध्ये पसरेल या गांधी जयंतीला लोकशाही वाचवण्याचा संकल्प करूया, असं त्यांनी म्हटलं आहे.
यापूर्वी 24 सप्टेंबर रोजी अभिजीत दीपके त्यांचे सहकारी सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी पत्रकार परिषद घेत ज्ञानेश कुमार यांना 48 तासांचा अल्टिमेटम दिला होता. यावेळी त्यांनी तीन प्रमुख मागण्या मांडल्या.
1. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई सुरू करावी.
2. एसआयआर प्रक्रियेला स्थगिती देऊन जानेवारी 2025 ची मतदार यादी पुन्हा लागू करावी.
3. 2023 चा कायदा रद्द करून निवडणूक आयोगात सुधारणा कराव्यात.
निवडणूक आयोग आणि एसआयआर प्रक्रियेवरून सुरू असलेल्या वादाला 23 सप्टेंबर रोजी 'इंडियन एक्स्प्रेस'च्या एका वृत्तामुळे आणखी उधाण आलं. या वृत्तात एसआयआर प्रक्रियेदरम्यान तीन निवडणूक आयुक्तांपैकी दोन आयुक्तांनी दहा महिन्यांत 14 वेळा आक्षेप नोंदवल्याचा दावा करण्यात आला होता. निवडणूक आयोगातील वाद चव्हाट्यावर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.