चीनमुळे नेपाळमध्ये महाप्रलय? 300 जणांचा मृत्यू, शेकडो भारतीय बेपत्ता

Nepal Flood Disaster: विनाशकारी पुरामुळे नेपाळमध्ये मोठी हानी झाली असून 300 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. शेकडो भारतीय बेपत्ता असून रसुवा जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे.
Nepal Floods: 300 Dead, Hundreds Of Indians Missing; China Connection Questioned
Nepal Floods: 300 Dead, Hundreds Of Indians Missing; China Connection Questionedsaam tv
Published On

नेपाळमध्ये आलेल्या अत्यंत विनाशकारी पुरामुळे मोठा विद्ध्वंस झालाय. या महाप्रलयात शेकडो लोक बेपत्ता झाले असून अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जातीय. विशेषतः रसुवा जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान जालंय..महापुरात अनेक पूलव आणि रस्ते वाहून गेले असून नागरी वस्तीत हाहाकार उडालाय. या पुराला चीनच जबाबदार असल्याचं बोललं जातंय.

काळजाचा ठोका चुकवणारं हे दृष्य आहे नेपाळमधलं. अचानक आलेल्या महापुरानं नेपाळच्या तीन जिल्ह्यांमध्य़े हाहाकार उडालाय. एखादं धरणं फुटावं तसा महाप्रलय तिबेटकडून नेपाळमध्ये आला आणि भोटे कोशी नदीनं रौद्र रूप धारण केलं. तिमुरे आणि स्याप्रुबेसी परिसरात पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे रस्ते वाहून गेले. अनेक वाहनं पाण्यात अडकली. या पुराच्या तडाख्यानं केवळ आर्थिक नुकसानच केलं नाही तर हा पूर अनेकांच्या जिवावरही उठला. या महाप्रलयात आतापर्यंत 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. तर शेकडो भारतीयही बेपत्ता झालेत. महत्वाचं म्हणजे या महापुराला चीनच जबाबदार असल्याचा आरोप होतोय.

Nepal Floods: 300 Dead, Hundreds Of Indians Missing; China Connection Questioned
Nepal floods: नेपाळमध्ये महापुराचा कहर! 160 जणांचा मृत्यू, 750 हून अधिक बेपत्ता; 133 भारतीय नागरिकांचाही समावेश

चीनमुळे नेपाळमध्ये महाप्रलय?

नेपाळमधल्या माध्यमांच्या दाव्यानुसार, चीन-नेपाळ सीमेच्या जवळ असलेल्या संवेदनशील हिमालयीन भागात मोठ्या प्रमाणावर बांधकामं झाली आहेत. ही बांधकामं चीनच्या हद्दीत असून या बांधकामांसाठी डोंगर कापण्यात आले आहेत. तसच नैसर्गिक जलमार्गात बदल करण्यात आले आहेत.

यामुळे हिमालयातील पर्यावरणीय संतुलन बिघडलं असून हिमस्खलन आणि अचानक पूर येण्याचा धोका वाढतोय. तिबेटमधून आलेल्या या जलप्रलयाची पूर्वसूचना नेपाळला वेळेत मिळाली नाही असाही एक आरोप आहे.

Nepal Floods: 300 Dead, Hundreds Of Indians Missing; China Connection Questioned
नेपाळमधील महापुरात २८८ भारतीय बेपत्ता; कोणत्या राज्यांतील किती नागरिक? परराष्ट्र मंत्रालयाकडून तपशीलासह हेल्पलाइन नंबर जाहीर

गंभीर बाब म्हणजे भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आला असून नेपाळच्या बाजूला ग्यिरॉन्ग पोर्ट परिसरात एका मोठ्या कृत्रिम तळ्याची निर्मिती झालीय. या सरोवराचा आकार आणि पाण्याची पातळी झपाट्यानं वाढत असल्यानं सीमावर्ती भागात पुन्हा महापुराचा हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. दरम्यान चीननं एक निवेदन प्रसिद्ध करत आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. आपण कोणतीही माहिती लपवली नाही असा दावा चिनी दुतावासानं केलाय. त्यामुळे चीनी ड्रॅगनचा हा दावा खरा आहे की कांगावा, हे आता पुराची कारणं शोधल्यानंतरच स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com