धक्कादायक! ४२६ विद्यार्थ्यांच्या जेवणात फिनाईल मिसळलं, शिक्षकाचा अजब कारनामा, संतापजनक कारण समोर

Teacher Mixed Phenyl in Meal: सुकमा जिल्ह्यातील ४२६ विद्यार्थ्यांच्या जेवणात फिनाईल मिसळल्याचा धक्कादायक प्रकार. आरोपी शिक्षक धनंजय साहूला अटक, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
Crime news
Crime newsSaam Tv
Published On
Summary
  • सुकमा जिल्ह्यातील ४२६ विद्यार्थ्यांच्या जेवणात फिनाईल मिसळल्याचा धक्कादायक प्रकार.

  • आरोपी शिक्षक धनंजय साहूला अटक, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

  • जुन्या वादातून बदला घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळल्याचं पोलिस तपासात स्पष्ट.

  • प्रशासनाने आरोपीसह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून निलंबन व बदली केली.

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पाकेला पोर्टा केबिन निवासी विद्यालयात तब्बल ४२६ विद्यार्थ्यांच्या जेवणात फिनाईल मिसळल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी शिक्षक असून, त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

धनंजय साहू असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षक धनंजय साहू आणि वसतिगृह अधीक्षक दुजल पटेल यांच्यात गेल्या वर्षभरापासून वाद सुरू होता. याआधी साहू अधीक्षक पदावर होता. मात्र, एका विद्यार्थ्याला मारहाण गंभीर जखमी केल्यानं त्यांना या पदावरून हटवण्यात आले.

Crime news
आमदाराच्या मुलाच्या घराबाहेर आढळला मोलकरणीचा मृतदेह, शरीर अन् चेहऱ्यावर जखमा; नेमकं काय घडलं?

त्यानंतर दुजल पटेल यांची अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. याच रागातून बदला घेण्यासाठी साहू यांनी विद्यार्थ्यांच्या जेवणात फिनाईन मिसळल्याचा प्रकार समोर आले. ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर प्रशासनाने जलद पावले उचलण्यास सुरूवात केली.

कलेक्टर देवेश कुमार ध्रुव यांनी आरोपी शिक्षक धनंजय साहू यांना निलंबित केलं. अधीक्षक दुजल पटेल यांनाही पदावरून हटवून समग्र शिक्षण विभागात हलवले आहे. सहाय्यक अधीक्षक गौतम कुमार ध्रुव यांनाही हटवण्यात आले. त्यांना माध्यमिक शाळेत पाठवण्यात आले आहे. त्यांच्या जागी भवसिंग मंडावी यांची नवीन अधीक्षक म्हणून नियुक्ती कऱण्यात आली आहे.

Crime news
मुंबईत मनोज जरांगे दाखल होण्याआधीच भाजपकडून बॅनरबाजी, देवेंद्र फडणवीसांचा फोटो अन्.. नेमकं काय लिहिलंय?

न्यायालयीन कारवाई

सुकमा जिल्ह्याचे एसपी रोहित शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या शिक्षकाला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com