सरकारची मोठी घोषणा! 10-12वीमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थांना मिळणार हेलिकॉप्टर राईड

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की यामुळे इतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांची स्वप्ने पूर्ण होतील.
Helicopter
HelicopterSaam Tv

Chhatisgarh Board Result 2022: राज्याचे सरकार आता 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना हेलिकॉप्टर राईड देणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी गुरुवारी ही घोषणा केली. मुलांना शैक्षणिक क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील टॉपर्सना हेलिकॉप्टर राईड उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

तसेच, यामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन मिळेल आणि त्यांची स्वप्ने साकार होतील, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. 10वी-12वीच्या राज्य आणि जिल्हा टॉपर्सना मुख्यमंत्र्यांच्या चॉपर राईडमधून राईड मिळणार आहे. याद्वारे आपल्या विद्यार्थ्यांना काही आगळीवेगळी प्रेरणा मिळेल, तसेच काही अनोखे बक्षीस मिळाले तर त्यांना यश संपादन करण्याची प्रेरणा आणखीनच वाढेल, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

Helicopter
नुसरत भरुचाला कंडोम विकणे पडले महागात! ट्रोल झाल्यावर म्हणाली…

छत्तीसगड बोर्डाच्या 10वीच्या परीक्षा 03 मार्च ते 23 मार्च या कालावधीत घेण्यात आल्या होत्या, तर 12वी बोर्डाच्या परीक्षा 02 मार्च ते 30 मार्च या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आता निकालाची प्रतीक्षा आहे. निकालाच्या तारखेबाबत बोर्डाने अद्याप कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. कदाचित या महिन्यात बोर्ड आपला निकाल जाहीर करू शकते.

हे देखील पहा-

निकालापूर्वी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी ही घोषणा केली आहे. याबाबतची माहितीही त्यांनी ट्विटद्वारे दिली आहे. इयत्ता 10वी आणि 12वी मध्ये टॉप करणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकार हेलिकॉप्टर राईड देणार आहे असे ट्विट त्यांनी केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com