Bijapur Encounter: बिजापूरचा 'बदला'पुरा! सुरक्षा दलाच्या चकमकीत 12 नक्षलवादी ठार

Naxalite Killed In Bijapur Encounter: बिजापूरच्या जंगलात सकाळपासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. या चकमकीत १२ नक्षलवाद्यांचा खात्मा केला असून अद्या चकमक सुरू आहे.
Bijapur Encounter
Naxalite Killed In Bijapur Encountergoogle
Published On

छत्तीसगडच्या बीजापूरच्या जंगलात आज सकाळपासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक चालू आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलाने संध्याकाळपर्यंत १२ नक्षलावाद्यांना ठार केलंय. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीजापूर आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या जंगलात सुरक्षादलाकडून नक्षलवाद्यांविरोधात मोठं मोहीम राबवली जातेय. यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये थांबून-थांबून गोळीबार केला जात आहे.

बिजापूरमध्ये सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरूय. तेलंगणाच्या सीमेवरील अनेक गावांमध्ये नक्षलवाद्यांवर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी चकमकीच्या ठिकाणाहून एसएलआरसह अनेक हायटेक शस्त्रेही जप्त केली आहेत. बिजापूरमध्ये सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरू केलीय. तेलंगणाच्या सीमेवरील अनेक गावांमध्ये ही कारवाई केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

चकमक अजूनही सुरूच असून या ऑपरेशनमध्ये DRG बिजापूर, DRG सुकमा, DRG दंतेवाडा, कोब्रा 204, 205, 206, 208, 210 आणि CARIPU 229 बटालियनचा या सहभाग आहे. या सर्व बटालियनचे जवान नक्षलवाद्यांविरोधात मोठ्या कारवाया करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजापूरच्या मरुधबाका आणि पुजारी कांकेर भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. ठिकाणाहून एसएलआरसह अनेक हायटेक शस्त्रेही जप्त केली आहेत. या भागात नक्षलवादी लपून बसल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर जवानांनी शोध मोहीम हाती घेतली.

Bijapur Encounter
Chhattisgarh Encounter: छत्तीसगडमध्ये धुमश्चक्री, चकमकीत ५ नक्षलवाद्यांचा खात्मा

या शोध मोहिमेदरम्यान नक्षलवाद्यांनी पळ काढत जवानांवर गोळीबार सुरू केला. त्यानंतर जवानांकडूनही त्या गोळीबारीला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. गोळीबार हा थांबून-थांबून केला जात आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, १२ नक्षलवादी ढेर झाले आहेत. काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमधील बिजापूर येथील कुत्रू या जंगलात नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या वाहनाला लक्ष्य केले होते.

Bijapur Encounter
Naxal Attack: छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये नक्षलवादी हल्ला, ९ जवान शहीद

नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोटाद्वारे जवानांचे वाहनावर हल्ला करण्यात आला होता. काही जवान शहीद झाले होते. त्या जवानांचा बदला सुरक्षा दलाने मोजून दहा दिवसात घेतलाय. या भीषण अपघातात ८ जवान शहीद झाले. एका चालकाचाही मृत्यू झाला. हे सर्व सैनिक अबुझमद भागात नक्षलविरोधी अभियान राबवून परतत होते. त्याचवेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि सैनिकांचे वाहन उडवण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com