Chhattisgarh Encounter: छत्तीसगडमध्ये धुमश्चक्री, चकमकीत ५ नक्षलवाद्यांचा खात्मा

Chhattisgarh News: सुरक्षा दलाच्या जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. आणखी काही नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर येत आहे.
Chhattisgarh Encounter: छत्तीसगडमध्ये मोठी चकमक, ५ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश
Naxalites EncounterSaam Tv
Published On

छत्तीसगडच्या कांकेरमध्ये जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीमध्ये ५ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. या चकमकीमध्ये २ जवान जखमी झाले आहेत. घटनास्थळावर जवानांकडून सर्च ऑपरेन सुरू आहे. आणखी काही नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ठार केलेल्या नक्षलवाद्यांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील कांकेर भागातील माडच्या जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये सकाळपासून चकमक सुरू आहे. पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत ५ नक्षलवादी ठार झाले आहेत. नक्षलवाद्यांच्या मोठ्या टोळीसोबत जवानांमध्ये ही चकमक सुरूच आहे. या चकमकीत अनेक नक्षलवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. आतापर्यंत तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

Chhattisgarh Encounter: छत्तीसगडमध्ये मोठी चकमक, ५ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश
Chhattisgarh Health Center: धक्कादायक! आरोग्य केंद्रावर वीज संकट; मोबाईल टॉर्चच्या उजेडातच रुग्णांवर उपचार

२०२६ पर्यंत छत्तीसगडमधील नक्षलवाद संपवण्यासाठी सरकारकडून वेगाने पाऊलं उचलली जात आहेत. दक्षिण बस्तर हा नक्षलवाद्यांचा सर्वात मोठा परिसर मानला जातो. सुरक्षा दलाने याठिकाणी २ छावण्या उभारल्या असून नक्षलवाद्यांना संपवण्याचा इशारा दिला आहे. सध्या बस्तरमधील कांकेर, नारायणपूरच्या अबुझमदमध्ये नक्षलवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे.

Chhattisgarh Encounter: छत्तीसगडमध्ये मोठी चकमक, ५ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश
Chhattisgarh Crime: संतापजनक! काळी जादू करण्याचा संशय; गावकऱ्यांनी ३ महिलांसह ५ जणांची केली हत्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com