Chhattisgarh Crime News : 19 फेब्रुवारीला लग्न, 21 तारखेला रिसेप्शनपूर्वी रक्तरंजित खेळ; बंद खोलीत आढळला जोडप्याचा मृतदेह

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एका खोलीत नवीन लग्न झालेल्या जोडप्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
Chhattisgarh Cirme News
Chhattisgarh Cirme NewsSaam Tv
Published On

Chhattisgarh News : छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एका खोलीत नवीन लग्न झालेल्या जोडप्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी 21 फेब्रुवारी रोजी रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, त्यासाठी नवरदेव तयार होण्यासाठी खोलीत गेला होता. तेथे त्याचे काही कारणावरून पत्नीशी भांडण झाले, त्यानंतर तरुणाने आधी पत्नीवर चाकूने वार करत तिचा खून केला आणि नंतर स्वतःवर वार करून मृत्यूला कवटाळले. ही घटना रायपूरच्या टिकरापारा भागातील आहे. 

Chhattisgarh Cirme News
Chalisgaon News: माहेरी पाठवत मोबाइलवर तलाक; पतीसह आठ जणांवर गुन्हा

या दोघांचे 19 फेब्रुवारी रोजी दोघांचे लग्न झाले होते, त्यानंतर दोघेही 21 फेब्रुवारीला रिसेप्शन पार्टीसाठी तयार होण्यासाठी रूममध्ये गेले. दरम्यान, दोघांमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला, त्यानंतर अस्लमने आपल्या बेगम काहकाशा बानोवर चाकूने वार केले. 

या हल्ल्यात नवरी गंभीर जखमी झाली, त्यानंतर अस्लमने स्वतःवरही वार केले. दोघांनाही गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहे. सध्या पोलिसांनी चाकू ताब्यात घेतला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Chhattisgarh Cirme News
Maharashtra Government : ठरलं तर ! सरकार पुन्हा देणार आनंदाचा शिधा, कधी व का ? वाचा सविस्तर

19 फेब्रुवारीला दोघांचे लग्न झाले होते

मिळालेल्या माहितीनुसार, संतोषी नगर नई बस्ती येथील रहिवासी असलमचे 19 फेब्रुवारीला राजतलाब येथील रहिवासी काहकशा बानोसोबत लग्न झाले होते. 21 फेब्रुवारीला दोघांचे लग्नाचे रिसेप्शन होते. दरम्यान, दोघेही तयार होण्यासाठी खोलीत गेले असता दोघांमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला.

काही वेळातच हे प्रकरण इतके वाढले की नवरदेवाने नवरीवर चाकूने वार केले आणि नंतर स्वतःला चाकूने वार करून जखमी केले. घटनेची माहिती मिळताच परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दोघांनी हे पाऊल का उचलले, त्याची माहिती मिळू शकली नाही. याप्रकरणी पोलीस (Police)अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com