Political News : लिंबू कापला पाऊस थांबवला! भाजप खासदाराचा भर कार्यक्रमात अजब दावा

Chhattisgarh Political News : भाजप खासदार भोजराज नाग यांनी देवाला प्रार्थना करून लिंबू कापल्याने पाऊस थांबल्याचा दावा केला. त्यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांच्यासह मंचावरील नेत्यांना हसू आवरले नाही.
BJP MP Bhojraj Nag Claims He Stopped Rain By Cutting Lemon
BJP MP Bhojraj Nag Claims He Stopped Rain By Cutting LemonAI Image
Published On
Summary
  • भाजप खासदार भोजराज नाग यांनी पाऊस थांबवल्याचा अजब दावा केला

  • देवाला प्रार्थना करून लिंबू कापल्यानंतर पाऊस थांबल्याचे त्यांनी सांगितले

  • मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांच्यासह मंचावरील नेत्यांना खासदारांच्या वक्तव्यावर हसू आले

  • या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

छत्तीसगडच्या कांकेर लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार भोजराज नाग सध्या त्यांच्या एका अजब दाव्यामुळे चर्चेत आले आहेत. बालोद जिल्ह्यातील डौंडीलोहारा येथे आयोजित शासकीय कार्यक्रमात बोलताना त्यांनी खराब हवामान आणि पाऊस देवाला प्रार्थना करून आणि लिंबू कापून पाऊस थांबवल्याचा दावा केला. खासदारांचा हा दावा ऐकून मंचावर उपस्थित मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांच्यासह इतर नेत्यांनाही हसू आवरता आले नाही.

डौंडीलोहारा येथे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांच्या उपस्थितीत महतारी वंदन योजनेचा ३१वा हप्ता जारी करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या आधीपासूनच परिसरात ढगाळ वातावरण होते. मुसळधार पावसाची शक्यता असल्याने कार्यक्रमावरही हवामानाचे सावट होते. खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळेबाबतही काही प्रमाणात अनिश्चितता निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर मंचावरून बोलताना खासदार भोजराज नाग यांनी आपल्या भाषणादरम्यान हवामानाचा किस्सा सांगितला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री कार्यक्रमाला येणार असल्याचा प्रोटोकॉल रात्री १२ वाजता जारी झाला होता. सोमवारपासूनच हवामान खराब होते आणि पाऊस पडण्याची शक्यता होती.

BJP MP Bhojraj Nag Claims He Stopped Rain By Cutting Lemon
Sugar Rates : रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वसामान्य नागरिकांचं तोंड गोड! साखरेच्या दरात घसरण, १ किलोचे आजचे दर काय? वाचा

यानंतर भोजराज नाग यांनी केलेल्या दाव्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी सांगितले की, त्यांनी देवाला प्रार्थना केली आणि त्यानंतर लिंबू कापून पाऊस थांबवला. त्यांच्या या वक्तव्यावर मंचावरील वातावरणच बदलले. खासदारांनी पुढे मिश्कील अंदाजात सांगितले की, आता कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला आहे. त्यामुळे यानंतर पाऊस झाला तरी काही हरकत नाही. तसेच मुख्यमंत्र्यांच्या रात्रीच्या मुक्कामातही त्यामुळे कोणतीही अडचण येणार नसल्याचे त्यांनी म्हटले.

BJP MP Bhojraj Nag Claims He Stopped Rain By Cutting Lemon
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट! 'या' महिलांना मिळणार नाही हप्ता; तुमचं यात नाव नाही ना?

भोजराज नाग यांचे हे वक्तव्य ऐकताच मुख्यमंत्री विष्णुदेव साय जोरात हसू लागले. खुद्द खासदारांसह मंचावर उपस्थित इतर लोकप्रतिनिधींनाही आपले हसू आवरता आले नाही. या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटकऱ्यांकडून त्यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. खासदार भोजराज नाग यांच्या या अनोख्या दाव्यामुळे कार्यक्रमातील हा प्रसंग सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com