Elephant Camp: हत्तींच्या झुंजीत महिला पर्यटकाचा मृत्यू, नवऱ्याच्या डोळ्यासमोर सोडले प्राण; थरकाप उडवणारा VIDEO

Karnataka Dubare Camp Video: कर्नाटकातील दुबारे एलिफंट कॅम्पमध्ये थरकाप उडवणारी घटना घडली. याठिकाणी आलेल्या महिला पर्यटकाचा हत्तीच्या झुंजीत सापडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
Elephant Camp: हत्तींच्या झुंजीत महिला पर्यटकाचा मृत्यू, नवऱ्याच्या डोळ्यासमोर सोडले प्राण; थरकाप उडवणारा VIDEO
Karnataka Dubare Camp VideoSaam Tv
Published On
  • कर्नाटकच्या दुबारे एलिफंट कॅम्पमध्ये महिला पर्यटकाचा मृत्यू

  • हत्तींच्या झुंजीत महिला चिरडली गेली

  • या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ आला समोर

  • नवऱ्याच्या डोळ्यासमोर महिलेने सोडले प्राण

कर्नाटकच्या कोडगू जिल्ह्यातून एक भयंकर घटना समोर आली आहे. याठिकाणी प्रसिद्ध असलेल्या दुबारे एलिफंट कॅम्पमध्ये सोमवारी सकाळी एका महिला पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोन हत्तींच्या झुंजीमध्ये सापडलेल्या या महिला पर्यटकाचा चिरडून मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. पर्यटक हत्ती पाहण्यासाठी कॅपमधील नदी किनाऱ्यावर गेले होते. त्यावेळी अचानक दोन हत्तींमध्ये झुंज सुरू झाली. यावेळी एकच गोंधळ उडाला. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

२ हत्तींच्या झुंजीमध्ये चेन्नई येथून आलेली ३३ वर्षीय महिला पर्यटक खाली पडली. हत्ती अंगावर पडल्यानंतर महिला त्याखाली चिरडली गेली. यावेळी या महिलेच्या नवऱ्याने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही. हत्तीच्या पायाखाली चिरडून महिला गंभीर जखमी झाली. या महिलेला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. जिनू असं मृत महिलेचे नाव असून ती तामिळनाडूच्या चेन्नई येथे राहत होती.

या घटनेनंतर प्रशासन आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली. या घटनेमुळे दुबारे हत्ती कॅम्पमधील पर्यटकांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दुबारे हत्ती कॅम्प हे कर्नाटकातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी हत्तींना जवळून पाहण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित उपक्रमांचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक याठिकाणी येत असतात.

Elephant Camp: हत्तींच्या झुंजीत महिला पर्यटकाचा मृत्यू, नवऱ्याच्या डोळ्यासमोर सोडले प्राण; थरकाप उडवणारा VIDEO
Karnataka Bank Heist: मनी हाईस्ट स्टाईल दरोडा; SBI बँकेतून 20 किलो सोनं आणि 1.16 कोटी लंपास

दुबारे एलिफंट कॅम्प हे कर्नाटकातील कोडगू जिल्ह्यातल्या कावेरी नदीच्या काठावर वसलेले आहे. हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून याठिकाणी हत्ती प्रशिक्षण केंद्र देखील आहे. हे कॅम्प त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी, निसर्गरम्य वातावरण आणि हत्तींसोबतच्या अनोख्या अनुभवांसाठी पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. येथे प्रशिक्षित हत्तींची काळजी वन विभागाच्या देखरेखीखाली घेतली जाते. या कॅम्पला अनेक पर्यटक दरवर्षी भेट देत असतात. ते याठिकाणी हत्तींना आंघोळ घालण्याचा, त्यांना खाऊ घालण्याचा आणि त्यांच्या वर्तनाचे जवळून निरीक्षण करण्याचा अनुभव घेतात. याच कॅम्पमध्ये महिला पर्यटकाचा मृत्यू झाल्यामुळे हा एक चर्चेचा विषय ठरला आहे.

Elephant Camp: हत्तींच्या झुंजीत महिला पर्यटकाचा मृत्यू, नवऱ्याच्या डोळ्यासमोर सोडले प्राण; थरकाप उडवणारा VIDEO
Karnataka News: कर्नाटकमध्ये मंदिरात उसळली गर्दी, शॉक लागल्याने चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती; 19-20 भाविक जखमी; VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com